नागपूर : राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सरकारकडून विदर्भासाठी काही वेगळी घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज भरगच्च कामकाज आहे. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज सरकारकडून उत्तर दिलं जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारकडून काय उत्तर मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. विधानपरिषदेत विरोधकांनी विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अंतिम आठवडा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावालाही अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून उत्तर दिलं जाणार आहे.


याशिवाय धनगर आऱक्षणाच्या मुद्यावरील चर्चा विधानसभेत प्रलंबित असून ही चर्चा आणि त्यावर सरकारचे उत्तरंही आज विधानपरिषदेत दिलं जाईल. पहिल्यांदाच नागपुरात पावसाळी अधिवेशन होत असून तीन आठवड्यांच्या या अधिवेशनाने विदर्भाला काही मिळणार की नाही त्याचे उत्तर अधिवेशनाच्या शेवटी मिळेल.