WhatsApp Users ना खुशखबर; आता बदलणार चॅटिंगची पद्धत, पाहा हे नवीन अपडेट
कंपनीने आपल्या Usersचा चॅटिंगचा अनुभव टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन अपडेट्स आणले आहेत. जेणेकरुन Usersच्या सेवेवर त्याचा परिणाम होणार नाही, आणि ते पूर्वीप्रमाणे मजेशीर पद्धतीने WhatsApp वापरु शकतील.
मुंबई : व्हॉट्सऍप (WhatsApp)ची काही महिन्यांपासून प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) मुळे खूप जास्त वाद सुरू आहेत, त्यातच आता कंपनीने आपल्या Usersचा चॅटिंगचा अनुभव टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन अपडेट्स आणले आहेत. जेणेकरुन Usersच्या सेवेवर त्याचा परिणाम होणार नाही, आणि ते पूर्वीप्रमाणे मजेशीर पद्धतीने WhatsApp वापरु शकतील.
WhatsApp चे updates
आपल्या आवडीचे आणि मनाप्रमाने बनवा ऍनिमेटेड स्टिकर्स (WhatsApp Animated Stickers)
WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन अपडेट आणलं आहे. Users आता त्यांच्या चॅटिंगनुसार कस्टमाइज ऍनिमेटेड स्टिकर्स शेअर करू शकतील. तुम्हाला आता ऍपवर आधारित स्टिकर्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
व्हॉट्सऍप अपडेट्सचा अभ्यास करणाऱ्या WaBetaInfo नुसार, व्हॉट्सऍपमध्ये थर्डपार्टी ऍनिमेटेड स्टिकर पॅक्स (Animated Sticker Packs) करण्याची परवानगी देतो. याचा अर्थ आता रिअल टाइम व्हॉट्सऍपमध्ये स्टिकर पॅकचा वापर केला जाऊ शकतो.
काही देशात थर्ड पार्टी स्टिकर फीचर (WhatsApp Third Party Sticker Feature)
रिपोर्टनुसार, व्हॉट्सऍपने ब्राझील, इराण आणि इंडोनेशियामध्ये हे नवीन फीचर लॅान्च केले आहे. येत्या काळात हे फीचर भारतीय वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला थर्ड पार्टी ऍपवरून स्टिकर्स बनवायचे असतील तर स्टिकर मेकर स्टुडिओ तुम्हाला रिअल टाइममध्ये तुमच्या आवडीचे ऍनिमेटेड स्टिकर्स तयार करू देतो.
यासाठी ऍप डाउनलोड करा. मग ऍप उघडा आणि कॅमेऱ्यातून तुम्हाला हवे, ते व्हिडिओ रेकॉर्ड करा. हे ऍप ताबडतोब या व्हिडिओचे ऍनिमेटेड स्टिकर तयार करेल.
वॉटसऍप प्रायव्हसी पॉलिसीचा नवीन अपडेट (WhatsApp Privacy Policy)
Users सेवा आणि प्रायव्हसी पॉलिसी धोरणाच्या अटी अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी कंपनी लवकरच इन-ऍप (In-App Alert)अलर्ट दाखवेल. यापूर्वी कंपनीने Usersना सावध केले होते की ऍपची प्रायव्हसी पॉलिसी 15 मेपर्यंत स्वीकारावी लागेल. तसे न झाल्यास, वापरकर्ते ऍपमधील काही सेवांचा एक्सेस गमावू शकतात.
15 मे ला अजून 1 महिने शिल्लक आहेत. दरम्यान, कंपनी Usersना त्यांच्या अटी आणि शर्तींबद्दल आधीच Reminder पाठवत आहे. काही दिवसांपूर्वी ऍप उघडताना अनेक युजर्सना पॉप-अप (pop-up) मेसेज येत होते. Usersना पॉप-अपमध्ये कंपनीच्या नवीन नियम आणि प्रायव्हसी पॉलिसीबद्दल सावध केले जात आहे. "कृपया व्हॉट्सऍपचा वापर चालू ठेवण्यासाठी हे अपडेट्स स्वीकारा," असे त्यात म्हटले आहे.