मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. ज्याचे जग भरात यूजर्स आहेत. लोकं मेसेज, फोटो किंवा माहिती पाठवण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करतो. त्यामुळे आपले युजर्स दुसरीकडे कुठे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊ नये म्हणून कंपनी नवीन नवीन फीचर्स अपग्रेड करत असते. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुटुंब आणि मित्रांशी सहजपणे कनेक्ट होण्यास मदत करते. 2021 मध्ये एकामागून एक अनेक फीचर्स लाँच केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणखी एका छान फीचरवर काम करत आहे. या फीचरची ओळख करून दिल्याने तुमचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा अनुभव वाढेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी चर्चा आहे की कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, जेणेकरुन 2 युजर्समधील चॅट दरम्यान, एखाद्या व्यक्तीने चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर त्याचे नोटिफिकेशन समोरच्या व्यक्तीला मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना या फीचरचा मोठा फायदा होणार आहे.


रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने या फीचरवर काम सुरू झाले आहे. या अंतर्गत, चॅट दरम्यान त्या संभाषणासाठी दुसर्‍या वापरकर्त्याने घेतलेल्या स्क्रीनशॉटची माहिती वापरकर्त्याला मिळेल. ही माहिती लगेचच स्क्रीनवर दिसेल. मेसेज पाठवल्यावर जशी एक टिक, मेसेज पोहोचल्यानंतर दोन टिक आणि मेसेज रिसिव केलेल्याने वाचली तर दोन्ही टिक निळ्या पडतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.


परंतु आता कंपनी स्क्रीनशॉटच्या फीचरवर काम करत आहे, त्यामध्ये मेसेजवर 2 टिक दिसण्याऐवजी तीन टिक दिल्या जातील. हे सूचित करेल की दुसरा वापरकर्ता संपूर्ण संभाषणाचा स्क्रीनशॉट घेत आहे.


लवकरच चाचणी सुरू होऊ शकते


काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, व्हॉट्सअॅप लवकरच या फीचरची चाचणी सुरू करेल आणि चाचणी यशस्वी झाल्यानंतर ते सर्व यूजर्ससाठी रिलीझ केले जाईल. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, या वैशिष्ट्याबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फीचरबद्दल बोलले जात आहे.