WhatsApp : आज WhatsApp वर संपूर्ण जग अवलंबून आहे. पण गेल्या अर्ध्या तासांपासून व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद आहे. व्हॉट्सअ‍ॅप बंद असल्याने युझर्स हवालदिल आहेत. जगातील अनेक भागात व्हॉट्सअ‍ॅप बंद असल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप बंद असल्याने अनेक व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे WhatsApp बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअप (WhatsApp) सर्व्हर (Server Down) डाऊन झाल्यामुळे मेसेज जाण्याचा स्पीड (Speed) अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 



तांत्रिक बिघाडामुळे जगभरात व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झालंय. दुपारी 12 वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅप ठप्प झालंय. त्यामुळे करोडो ग्रुप्सवरचं मेसेजिंग थांबलंय. देशभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 48 कोटींहून अधिक युझर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप थांबल्यामुळे व्यवहारही रखडलेत. 


व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत कंपनीने अधिकृतरित्या अजून माहिती दिलेली नाही. त्यामुळे हा बिघाड नेमका कधी दुरूस्त होईल याबाबत नेटीझन्समध्ये संभ्रम आहे...