नवी दिल्ली : भाजपच्या महिला नेत्या आणि राज्य सभा सदस्या रूपा गांगूली यांच्यावर सोमवारी (२३ ऑक्टोबर) माफी मागण्याची वेळ आली. ही माफी त्यांनी विशेष कारणासाठी नव्हे तर, केवळ एका नजरचुकीने उडालेल्या गोंधळामुळे मागावी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...त्याचे झाले असे, रूपा गांगूली यांना 'स्टॅंडिंग कमेटी ऑन कॉमर्स'च्या बैठकीला हजर व्हायचे होते. मात्र, 'स्टॅंडिंग कमेटी ऑन ट्रान्सपोर्ट, टूरिजम अॅण्ड कल्चर'च्या बैठकीला हजर झाल्या. काही वेळ त्या तेथे थांबल्याही पण, बैठकीतील विषय पाहून त्यांच्या लक्षात आले की, आपण भलत्याच बैठकीत सहभागी झालो आहोत. आपल्याला ज्या कमेटीच्या बैठकीत सहभागी व्हायचे आहे ती बैठीक ही बैठक नव्हे. घडला प्रकार लक्षात येताच रूपा गांगूली यांनी उपस्थितांची माफी मागितली आणि त्या बाहेर पडल्या.


दरम्यान, रूपा गांगूली बाहेर पडत असलेल्या पाहून कमेटीचे अध्यक्ष डेरेक ओ ब्रॉयन यांनी त्यांना सांगितले की, जे सदस्य कमेटीचे सदस्य नाहीत, तेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहू शकतात. मात्र, ब्रॉयन यांच्या सूचनेला विनम्रपणे नकार देत आपल्याला दुसऱ्या बैठकीस उपस्थित रहायचे आहे, असे सांगत त्या तिथून बाहेर पडल्या.


कोण आहेत रूपा गांगूली


रूपा गांगूली या मुळच्या अभिनेत्री आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांनी दुरदर्शनवरील लोकप्रीयल मालिका महाभारतमध्ये द्रौपदीची भूमिका साकारली होती. ज्यामुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी इतरही टीव्ही मालिकांमध्ये काम केले. मात्र, त्यांना महाभारताइतका प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी २०१५ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१६ला त्यांनी पश्चिम बंगाल येथून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. २०१६ मध्ये त्या माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे माजी नेते नवज्योत सिंग सिद्दू यांच्या राजीनाम्याननंतर खाली झालेल्या जागेवर राज्यसभा सदस्या बनल्या.