Ram Mandir: सोमवारच्या दिवशी अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली आणि अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या दिवशी संपूर्ण देशात एक वेगळच उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं. दरम्यान असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाविकांच्या म्हणण्यानुसार, हनुमान रामलल्लाच्या दर्शनासाठी आले होते. या घटनेशी संबंधित एक मेसेज स्वतः श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे. 


मेसेजमध्ये काय नमूद करण्यात आलंय?


श्री रामजन्मभूमी मंदिरात आज घडलेल्या एका सुंदर घटनेचे वर्णन: आज सायंकाळी ५:५० च्या सुमारास एक माकड दक्षिणेकडील दरवाजातून गर्भगृहात शिरलं आणि उत्सव मूर्तीजवळ पोहोचले. बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी हे पाहिलं आणि ते माकड मूर्तीला धक्का लावेल या विचाराने त्याच्याकडे धावले. मात्र पोलीस माकडाच्या दिशेने धावतच माकड शांतपणे उत्तरेकडील दरवाजाकडे गेलं. यावेळी गेट बंद असल्याने तो पूर्वेच्या दिशेने गेलं आणि भाविकांच्या गर्दीतून पुढे निघालं. यावेळी त्याने कोणालाही त्रास दिला नाही आणि दरवाजातून बाहेर गेलं. सुरक्षा कर्मचार्‍यांचं म्हणणं आहे की, आमच्यासाठी जणू हनुमानजी स्वतः रामललाच्या दर्शनासाठी आले होते.



मंगळवारी इतक्या भाविकांनी घेतलं दर्शन


अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकनंतर मंगळवारी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल पाच लाख राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतल्याचं समोर आलं आहे. अयोध्येला पोहोचणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाने सर्व वाहनांना तातडीने बंदी घातली आहे. 


कशी आहे राम मंदिराची रचना?


22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केलं. अयोध्येतील राम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधण्यात आलंय. हे मंदिर 2.7 एकरावर बांधलं असून ते 3 मजली आहे. त्याची लांबी 380 फूट आणि उंची 161 फूट आहे. 
मंदिराचे प्रवेशद्वार 'सिंह द्वार' असून त्यात एकूण 392 खांब आहेत. याशिवाय मंदिरात 12 प्रवेशद्वार असतील.