मुंबई :  लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये लोक आतुरतेने फूड काउंटर उघडण्याची वाट पाहत असतात. कधीकधी, एखादा विशिष्ट स्टॉल उघडण्याआधीही तिथे गर्दी असते. एका कार्यक्रमाचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डोसा खाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. काही फोटो देखील समोर आले आहेत. ज्यात लोकांची डोसा खाण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. या व्हिडिओंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते. त्यात एका कार्यक्रमाचा एक व्हिडिओ खूप ट्रेंड करत आहे. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी डोसा स्टॉल लावण्यात आला आहे.
या स्टॉलच्या आजूबाजूला लोकांनी मोठी गर्दी आहे. लोकांना डोसा खाण्याची भयंकर घाई आहे.  आणि लोक प्लेट्ससह रांगेत उभं न राहता , गर्दी - गोंधळ निर्माण करीत आहेत.


पळून गेलेला डोसावाला


लोकांची एवढी मोठी गर्दी पाहून डोसा बनवणाऱ्याला राग येतो. डोसा शिजताच तो तिथून पळून जातो. तो डोसा आरामात भाजतो, नंतर तो पलटतो आणि तो दुमडतो. पण त्यानंतर, चिडचिड झाल्यावर, डोसा तव्यावर सोडून, ​​तो तिथून पळून जातो. मग लोक स्वतः पुढे येतात आणि तो फोडून डोसा घेतात.