नवी दिल्ली :  कायदा, सुव्यस्थेची पाहणी करण्यासाठी पोलीस किंवा मंत्र्यांना रस्त्याने फिरताना आपण पाहिले असेल. पण दिल्लीमध्ये चक्क हायकोर्टचे सहा न्यायाधीश पाहणीसाठी कोर्टाबाहेर पडले. विशेष म्हणजे यावेळी ते कोणत्या अलिशान गाडीत नव्हते तर चक्क रिक्षामधून प्रवास करत होते. दिल्लीमधील कोर्टाची पाहणी करण्यासाठी या सहा न्यायाधिशांनी रिक्षातून जाणे पसंत केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूवारी दिल्ली हायकोर्टातून सहा रिक्षा बाहेर पडल्या. सकाळच्या वेळेत अचानक बाहेर पडलेल्या रिक्षांकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या. कारण या सहा रिक्षांमध्ये दिल्ली हायकोर्टाचे सहा न्यायाधीश बसले होते. या चमूचे नेतृत्व न्या. गीता मित्तल करत होत्या. या न्यायाधीशांनी दिल्लीतील सहा जिल्हा न्यायालयांना अचानक भेट दिली. तेथील कामकाज आणि सुविधांची पाहणी केली. 


कारवाई होणार


दिल्लीमधील कोर्टातील वातावरण आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांची शिस्तबद्धता पाहण्यासाठी करण्यात आली होती. या ६ कोर्टांवर आता हे न्यायाधीश एक रिपोर्ट तयार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.  या रिपोर्टमध्ये गंभीर त्रुटी आढळलेल्या 'न्यायालयांवर' कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.