बाईकवर 7 लोक बसले म्हणून पोलिसांनी थांबलं, `हे` कारण देऊन त्याने सगळ्यांनाच चक्रावलं, पाहा व्हिडीओ
सोशल मीडिया हे अशा भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे की, ज्याचा आपण कधीही विचार करु शकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक कन्टेन्ट असतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात.
मुंबई : सोशल मीडिया हे अशा भन्नाट गोष्टींनी भरलेलं आहे की, ज्याचा आपण कधीही विचार करु शकत नाही. सोशल मीडियावर असे अनेक कन्टेन्ट असतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू येईल. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बाईक चालवण्याची बेसिक नियम माहित असतात. ज्यामध्ये हेल्मेट घालणे आणि फक्त दोन लोकांना गाडीवरुन प्रवास करायला असलेले परवानगी, हे तर आपल्याला माहितच आहे आणि ते नियम जर आपण पाळले नाही तर आपल्याला वाहतुक पोलिस पकडणार हे निश्चत.
परंतु असं असताना एक व्यक्ती वाहतुकीचे महत्वाचे दोन नियम तोडतो. शिवाय तो हे दोन नियम तोडण्याचे कारण सांगतो ते फारच विचित्र आहे. जे पोलिसांसाठी देखील हैराण करणार आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बाईकवर चक्क 7 लोकं प्रवास करत आहेत. एवढेच नाही तर हा व्यक्ती विना हेल्मेट देखील गाडी चालवत आहेत. त्यावेळी पोलिस त्यांना थांबवतात आणि असे करण्यामागचं कारण विचारतात. तेव्हा हा व्यक्ती सांगतो की, ते सगळे लोक रुग्णालयात जात आहे आणि त्यांना एमरजन्सी देखील आहे. त्याचं हे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.
यानंतर पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली की, नाही हे काही कळलेलं नाही. परंतु असं जीवाशी खेळणं केव्हाही चांगलं नाही. यामुळे तुम्ही स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव देखील धोक्यात टाकता. हा व्हिडीओ मनोरंजक दिसत असला, तरी यातुन तुम्ही एक चांगलं उदाहरण घ्या आणि अशी चुक कधीही करु नका.
kholdoRadio नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या गाडीवर चालकासोबत 2 महिला आणि 4 मुलं बसली आहेत.