नवी दिल्ली : दिल्लीकरांसाठी लाईफलाईन बनलेली मेट्रोच्या अपघातांच्या बातम्या हल्ली दररोजच्या झाल्यात. दिल्ली मेट्रोचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत मेट्रोचा अपघात होता होता टळला. ही घटना दिल्लीच्या रेड लाईनच्या शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनमधील आहे. येथे एका युवकाने एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी शिड्या नव्हे तर रेल्वे लाईनचा वापर केला. 


पहिल्यांदा मेट्रोमधून प्रवास करत होता हा तरुण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना २२मेची सकाळी सहा वाजताची आहे. शास्त्रीनगर मेट्रो स्टेशनवर २१ वर्षाचा मयूर पटेल नावाचा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर होता. मयूरला रोहिणी स्थानकाच्या दिशेने जायचे होतेय. मात्र चुकीने तो काश्मीरी गेटला जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचला. समोरच्या प्लॅटफॉर्मवरुन रोहिणीला गाडी जाते हे त्याला समजले. तेव्हा मयूरने शिड्यांचा वापर न करता रेल्वे रुळावरुन क्रॉस करु लागला. मयूर पहिल्यांदा दिल्ली मेट्रोमधून प्रवास करत होता. दरम्यान, मेट्रो सुरु झाली मात्र पायलटने प्रसंगावधान राखत मेट्रो थांबवली आणि मयूरचा जीव वाचला.




सीसीटीव्हीमध्ये घटना झाली कैद


सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झालीये. जेव्हा मयूर रेल्वे लाईन क्रॉस करुन समोरच्या प्लॅटफॉर्मवर चढत होता तेव्हा मेट्रो सुरु झाली. मात्र पायलटने प्रसंगावधान राखताना मेट्रो थांबवली आणि त्याचा जीव वाचला.