जेव्हा अचानक काँग्रेस मुख्यालयात पोहोचले `मोदी`
काँग्रेस कार्यकर्त्ये झाले अचंबित
नवी दिल्ली : बुधवारी लखनऊमधील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात जेव्हा एक व्यक्ती अचानक पोहोचला तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्ये अचंबित झाले. अचानक त्यांना समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयात येत असताना दिसले.
काँग्रेस कार्यकर्ते झाले अंचबित
पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, पंतप्रधान मोदी अशा प्रकारे काँग्रेस कार्यालयात नाही येऊ शकत. हा व्यक्ती पंतप्रधान मोदींसारखा दिसणारा व्यक्ती होता. पण एका प्रश्नावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं ते म्हणजे त्यांच्या खात्यात 15 लाख रुपये कधी जमा होणार आहेत.
मोदींना घेरण्याचा प्रयत्न
काँग्रेस पंतप्रधान मोदींना काळ्यापैशांच्य़ा मुद्दयावर नेहमी घेरण्याचा प्रयत्न करते. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काळापैसा देशात परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. याच मुद्दयावर काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींनी घेरण्याचा प्रयत्न करतात.
भाजप विरोधात करणार प्रचार
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या प्रश्नावर अभिनंदन पाठक शांत झाले. मोदींसारखे दिसणारे अभिनंदन पाठक यांनी म्हटलं की, 'या प्रश्नांमुळेच मी काँग्रेस पक्षात येण्यासाठी मजबूर झालो. मी 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार करणार आहे.' पाठक यांनी बुधवारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांची भेट घेतली.