`माझं लग्न जवळपास झालं होतं,` जेव्हा रतन टाटांनी केला होता खुलासा, म्हणाले होते `आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर....`
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. पद्मविभूषण रतन टाटा यांना सोमवारपासून आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या आयुष्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 2020 मध्ये Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्द अनेकांनी खुलासे होते. यावेळी त्यांनी आपलं बालपण, आई-वडिलांचा घटस्फोट आणि जवळपास ठरलेलं लग्न यावर भाष्य केलं होतं.
1962 मध्ये न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चरमध्ये बी.एस मध्ये पदवी घेतल्यानंतर रतत टाटा कौटुंबिक कंपनीस सामील झाले. एका दशकानंतर ते टाटा इंडस्ट्रीजचे चेअरमन झाले आणि 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले.
मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, "माझं बालपण आनंदी होतं.पण माझा भाऊ आणि मी जसजसे मोठे होत गेलो, तसतसं आमच्या पालकांच्या घटस्फोटामुळे आम्हाला बऱ्यापैकी रॅगिंग आणि अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा सामना करावा लागला. त्या काळात घटस्फोट होणं आजच्यासारखं सामान्य नव्हतं".
“पण माझ्या आजीने आम्हाला प्रत्येक प्रकारे मोठं केलं. माझ्या आईने दुसरं लग्न केल्यावर लगेचच शाळेतील मुलं आमच्याबद्दल सातत्याने आणि आक्रमकपणे सर्व प्रकारच्या गोष्टी बोलू लागली होती. पण आमच्या आजीने आम्हाला कोणत्याही किंमतीत सन्मान राखायला शिकवले, हे मूल्य आजपर्यंत टिकवलं आहे,” असं रतन टाटांनी सांगितलं होतं.
'जवळपास लग्न झालं होतं'
यावेळी रतन टाटांनी सांगितलं होतं की, आर्किटेक्चरची पदवी घेतल्यानंतर ते लॉस एंजेलिसमधील आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करु लागले आणि तिथेच ते प्रेमात पडले आणि जवळजवळ लग्न झालं होतं.
“कॉलेजनंतर, मी लॉस एंजेलिसमध्ये एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरीला लागलो, जिथे मी दोन वर्षे काम केलं. तो एक चांगला काळ होता . हवामान सुंदर होते, माझ्याकडे माझी स्वतःची कार होती आणि मला माझी नोकरी आवडत होती. तिथेच मी प्रेमात पडलो आणि जवळजवळ लग्न केलं. पण त्याच वेळी मी माझ्या आजीपासून दूर असल्याने किमान तात्पुरता परत जाण्याचा निर्णय घेतला होता, तिची तब्येत जवळपास 7 वर्षं चांगली नव्हती,” असं त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला सांगितलं होतं.
"मी तिला भेटलो".
"मी आजीला भेटायला परत आलो आणि मला वाटलं की ज्या व्यक्तीशी मला लग्न करायचं आहे ती माझ्यासोबत भारतात येईल. पण 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे तिच्या पालकांना विरोध केला आणि नातं तुटल,” अशी माहिती त्यांनी दिली होती.