नवी दिल्ली : लोकपाल बील संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले आहे. लोकपाल वरील निवड समितीची बैठक केव्हा होणार हे दहा दिवसात सांगा असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हटले आहे. लोकपाल वरील या समितीद्वारेच लोकपालचे सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. केंद्र सरकारला हा प्रश्न विचारण्या सोबतच मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रशांत भूषण यांची याचिका देखील फेटाळून लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकपालवर बनवली गेलेली निवड समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे सार्वजनिक करावीत अशी याचिका प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश जारी करावा अशी प्रशांत भूषण यांची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाने वकिल प्रशांत भूषण यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. 


दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती (सीओए) आज होणाऱ्या बैठकीत हार्दीक पांड्या आणि केएल राहुल यांच्या सदर्भातील प्रकरण बीसीसीआयचे नवनियुक्त लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे सोपावणार आहेत. एका टीव्ही कार्यक्रमा दरम्यान महिलांबद्दल आपत्तीजनक विधान केल्याने हे दोघे वादात अडकले आहेत. राहुल आणि पांड्याला सिने निर्माता करण जोहरच्या शोमध्ये वादग्रस्त विधान केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. पण तपास लांबणीवर गेल्याने त्यांचे निलंबन परत घेण्यात आले.