नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सुरूवातीपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा - महाविद्यालये सुरू व्हायला सुरूवात झाली होती. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाल्याने पुन्हा सर्व शाळा महाविद्यालये बंद झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच सर्व पालकांचा तसेच विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न पडला आहे की, शाळा नक्की सुरू होणार तरी कधी? AIMSचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लहान मुलांचे लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत.


गुलेरिया यांनी म्हटले की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे दुसऱ्या तसेच तिसऱ्या चाचणीचे परिक्षण सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे. ड्रग कंन्ट्रोलर च्या मंजूरी नंतर लहान मुलांसाठी लसीचे डोस उपलब्ध होऊ शकतील.


गुलेरिया यांनी म्हटले की, कोवॅक्सिनच्या आधी जर फायजरच्या लसीला लहान मुलांसाठी परवानगी मिळाली तर सकारात्मक  वातावरण तयार होऊ शकते.