नवी दिल्ली : मणिपूरचे शिक्षणमंत्री टी राधेश्याम यांना राज्यातील शिक्षणाचा कसा विचका झाला आहे, याचे वास्तव दर्शन शनिवारी (१७ फेब्रुवारी) घडले. राधेश्याम यांनी एका शाळेला अचानक भेट दिली. या वेळी त्यांना विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या दोन खोल्यांमध्ये चक्क शेळ्यांचाही वर्ग भरत असल्याचे पहायला मिळाले.


फायदा उपटण्यासाठी सरकारची दिशाभूल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, राधेश्याम यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, आम्ही शाळा तपासायला गेलो तेव्हा तेथे कोणीच विद्यार्थी नव्हते. मात्र, आम्ही जेव्हा शाळेतील अधिकारी वर्गाला विचारले असता शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत. पण, आम्ही वास्तवता पाहिली असता भलतेच सत्य पुढे आले. टी राधेश्याम यांनी मायांग इंफाळ आणि वाबागई विधानसभा मतदार संघातील काही शाळांना भेटी दिल्या. या वेळी अनेक शाळा विद्यार्थ्यांचे भोजन, गणवेश आणि इतर साहित्य अधिक मिळावे म्हणून अनेक शाळा विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी सरकारला सादर करतात असेही त्यांनी सांगीतले.


काय म्हणाले राधेश्याम?


राधेश्याम यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, शाळांना भेट दिल्यावर आलेल्या अनुभव फारच वाईट होता. विद्यार्थ्यांसाठी शाळांना इमारती नाहीत. ज्या आहेत त्यात शेळ्या कोंडल्या जातात. तसेच, अनेक ठिकाणी तर शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांचाही पत्ता नसतो. ही व्यवस्था बदलण्यासाठी प्रचंड प्रयत्न करायला हवेत, असेही राधेश्याम म्हणाले.