Pran Pratishtha LIVE Updates : तब्बल 500 वर्षांनंतर तो क्षण जवळ आला आहे. श्री रामलल्ला यांची भव्य सुंदर मंदिरात पुन्हा प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. अयोध्यातील या सोहळ्याची प्रत्येक देशवासिय आतुरतेने वाट पाहत आहे. 22 जानेवारीला हा भव्य दिव्य सोहळ्याचा साक्षिदार राहण्यासाठी देशविदेशातून पाहुणे येणार आहेत. अख्खा देश त्यादिवशी राममय झालेला दिसणार आहे. या सोहळ्याची अंतिम तयारी पूर्ण झाली असून प्रत्येक भारतीयाला अयोध्येत जाणं शक्य नाही. अशात हा सोहळा लाइव्ह कसा पाहता येईल. किती वाजता हा सोहळा सुरु होणार आहे याप्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे समजणार आहेत. (Where can you watch Ram Mandir Pran Pratistha LIVE Answers to all your questions in one click)


कुठे पाहता येणार थेट प्रक्षेपण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या माहिती युनिट पीआयबीनुसार, 22 जानेवारीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम देशभरातील लोकांपर्यंत नेण्यासाठी दूरदर्शन (डीडी) कडून विशेष व्यवस्था केली आहे. यासाठी दूरदर्शन अयोध्येतील राम मंदिरात आणि आजूबाजूला 40 कॅमेरे बसवणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे 4K मध्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. तसंच या सोहळ्यासाठी दुपारी साडेबारा वाजेची वेळही निवडण्यात आलीय. लाइव्ह टेलिकास्टद्वारं तुम्ही घरबसल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊ शकता. 22 जानेवारीला दूरदर्शनवर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे स्क्रिनिंग सकाळी 11 वाजता सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे, असी माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण थेट प्रक्षेपण डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनलवर पाहता येणार आहे. 


यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर प्रसारित होणार


22 जानेवारीला दूरदर्शनवर रामलल्लाची विशेष आरती आणि मंदिराच्या उद्घाटनाचं थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. मुख्य मंदिर परिसराव्यतिरिक्त, दूरदर्शन आपल्या विविध चॅनेलवर सरयू घाटाजवळील राम की पायडी, कुबेर टिळामधील जटायू पुतळा आणि इतर ठिकाणी थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय इतर ब्रॉडकास्टरसाठीही दूरदर्शनद्वारे YouTube लिंक शेअर करण्यात येणार आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, भारताव्यतिरिक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचं प्रसारण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक तयार करण्यात येणार आहे. दरम्यान प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं की, दूरदर्शनशिवाय खासगी वाहिन्यांनाही दूरदर्शनच्या माध्यमातून फीड मिळणार आहे. त्यांनी सांगितले की G20 प्रमाणेच यावेळीही दूरदर्शन 4K मध्ये प्रसारित होईल.