ऑनलाईन की शोरुम... सर्वात जास्त भारतीय कपडे कुठून खरेदी करतात? सर्व्हेत झाला खुलासा
भारतात कपडे आणि कॉस्मेटिकचं मोठं मार्केट आहे. हेच लक्षात घेऊन ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आणि अॅप सुरु करण्यात आले आहेत. यामुळे दुकानं आणि मॉलला फटका बसल्याचं बोललं जात होतं. याचा खुलासा करणारा एक सर्व्हे समोर आला आहे.
Online Shops or Mall Survey : भारतात टेक्सटाइल इंडस्ट्री अर्थात भारतातील वस्त्रोद्योगाची (Textile Industry) व्याप्ती प्रचंड आहे, जगभरातील मोठमोठ्या कपड्यांच्या ब्रँडची (Cloths Brand) भारतात विक्री केली जाते. खरेदीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. काही जण टेलरकडून कपडे शिवून घेतात, काही जणं कपडे खरेदीसाठी शोरुम किंवा मॉलमध्ये जाणं पसंत करतात. तर युवा पिढीचा कल ऑनलाईन खरेदीवर (Online Shopping) आहे. हे सर्व पर्याय लक्षात घेऊन भारतीय कपडे खरेदीसाठी कोणता पर्याय जास्त निवडतात यावर एक सर्व्हे करण्यात आला. यात एत मोठी बाब समोर आली आहे.
मॉलमधऊन खरेदी की ऑनलाईन?
बिझनेस टुडेत प्रसिद्ध झालेल्या लोकल सर्कलच्या एका सर्वेक्षणानुसार, कपड्यांच्या खरेदीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. वेबसाईटमध्ये ऑनलाईन खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. पण आजही मॉल्स आणि स्टोअर्समधून कपड्यांच्या खरेदीला जास्त पसंती दिली जाते. सर्वेनुसार एकुण टक्केवारीच्या अर्ध्याहून अधिक लोकं कपडे खरेदी करण्यासाठी मॉल्स आणि दुकानांवर अवलंबून आहेत.
मॉल्स आणि स्टोअर्सना पसंती का?
LocalCircles च्या सर्वेक्षणानुसार 47 टक्के लोकांनी कपडे खरेदी करण्यासाठी मॉल किंवा स्टोअरमध्ये जाणं पसंत असल्याचं म्हटलं आहे. या ठिकाणी कपडे खरेदी करण्यापूर्वी ते ट्रायल करण्याची संधी मिळते. याशिवाय 40 टक्के लोकांनी कपड्यांची क्वालिटी प्रत्यक्ष तपासायला मिळत असल्याचं सांगितलं.
ई-कॉमर्स व्यवसायात वाढ
भारतात ई-कॉमर्स व्यवसाय मोठी वाढ होत आहे. जगभरातील ब्रँड्स ऑनलाइन साईटवर उपलब्ध आहेत. याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यावर अनेक सवलतीही दिल्या जात आहेत. पण यानंतर भारतात कपडे खरेदीच्या बाबतीत ऑनलाइन प्लॅटफॉर्म अजून मागे आहेत. सर्वेक्षणानुसार, केवळ 4 टक्के कुटुंबे आता कपडे खरेदीसाठी ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर करतात. तर 9 टक्के कुटुंबांच्या म्हणण्यानुसार कपडे कस्टम मेड किंवा टेलर-मेड असणं पसंत करतात.
या सर्व्हेत 11,632 लोकांची मतं नोंदवण्यात आली होती. यातल्या 4 टक्के लोकांनी ऑनलाईन कपडे खरेदीला पसंती दिली आहे. यामागे त्यांनी अनेक कारणंही सांगितली आहेत. 37 टक्के लोकांनी चांगली सवलत मिळत असल्याने ऑनलाईन कपडे खरेदी करत असल्याचं म्हटलं आहे. तर 27 टक्के लोकांनी रिटर्न आणि रिफंड सुविधेमुळे ऑनलाईन खरेदी परवडत असल्याचं सांगितलं. याशिवाय 26 टक्के लोकांनी ऑनलाईन शॉपिंगमध्ये कपड्यांचे विविध पर्याय मिळतात, ज्यात जुन्या फॅशनपासून लेटेस्ट डिझाईनचे कपडे पाहायला मिळतात असं सांगितलंय.
ऑनलाइन शॉपिंगवर सवलतीपासून रिटर्न आणि रिफंडपर्यंत सुविधा उपलब्ध असतानाही सर्वेक्षणातील लोकांनी कपडे खरेदी करण्यासाठी मॉल्स आणि स्टोअरमध्ये जाण्याला अधिक महत्त्व दिलं आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे 81 टक्के लोकांच्या मते स्टोअर्स आणि मॉल्समध्ये कपडे तपासण्याची सुविधा हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलंय. यापैकी 28 टक्के लोकांनी प्रत्यक्ष मॉल किंवा स्टोअर्समध्ये जाऊ कपडे खरेदी करणे आवडतं असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय बाजारातील दुकानांमध्ये चांगले सौदे करून कपडे खरेदी करू शकतात.
सर्व्हेनुसार कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन कपड्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पण त्यानंतर ग्राहक पुन्हा मॉल आणि स्टोअर्सकडे वळले. ऑनलाऊन खरेदीत डिलिव्हरी चार्जेस, रिटर्न चार्ज ही कारणंही याला कारणीभत आहेत.