Whatsapp Chat Viral: सोशल मीडियामुळे जग जवळ आलं आहे. एका क्लिकवर आपल्याला हवी असलेली माहिती मिळते. या सोशल मीडिया व्यासपीठावर (Social Media) अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. हे व्यासपीठ व्हिडीओ, फोटोपुरता मर्यादीत राहिलं न्सून आता व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणं (Whatsapp Message) देखील व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. मित्र-मैत्रिणी, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्या व्हायरल झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वाचले असतीलच. आता एका वडिलांनी आपल्या मुलीसाठी व्हॉट्सअॅपवर केलेला मेसेज व्हायरल होत आहे. मुलीला शैक्षणिक प्रगतीवरून वडिलांनी तिला टोमणा मारला आहे. यासाठी वडिलांनी मुलीला वैद्यकीय अहवालाचा दाखला दिला आहे. इंग्रजी माध्यमांमध्ये मार्कांसोबत गुणांकनही ग्रेड पद्धतीने केले जाते. ज्यामध्ये A+ सर्वोत्तम आहे, नंतर A, A- आणि B+, B, B- आणि C+, C, C- असे असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांनी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करताना लिहिलं आहे की,  'मी तुझ्या आणि तुझ्या मैत्रिणीचा ब्लड टेस्ट रिपोर्ट घेऊन आलो आहे.' तेव्हा मुलगी वडिलांना 'ओके' असं उत्तर देते. यानंतर त्याच्या वडिलांनी टोमणे मारत लिहिले की, 'तिथेही तुझी मैत्रीण पॉझिटिव्ह आहे आणि तू निगेटिव्ह आहेस.' हा मेसेज वाचल्यानंत वडील टोमणा मारत असल्याचं तिला कळलं. त्यावर तिने तात्काल 'पापा प्लीज' असं लिहिले आणि खूप रडणारे इमोजी टाकले.



तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट


आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हायरल मेसेज वाचला आहे. MoMo नावाच्या मुलीने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. वडील आणि मुलीचे संभाषण वाचून नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ग्रेडिंगवरून नंबर्स ठरवले जातात. एका यूजरने लिहिले, 'वडिलांनी असा टोमणा मारू नये.'