नवी दिल्ली : कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल  एएनआयने दिलेल्या वृत्तानंतर  प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॉंग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यातही या मुद्द्यावरून वाद-विवाद सुरू झाले आहेत. ट्विटरवर सध्या #RahulwaveKazakh टॉप ट्रेंड करत आहे. यामागची कारण जाणून घेण्याचा प्रयत्न झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांचे OfficeofRG हे ट्विटर अकाऊंट पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे एएनआय आपल्या वृत्तात म्हटले आहे. राहुल गांधी ट्विटरवर लोकप्रिय होण्यासाठी 'बोट्स' चा वापर करतात का ? असा प्रश्न या वृत्तातून उपस्थित केला जात आहे. 


२० हजार रिट्विट करणारे कोण ?


एएनआयने राहुलच्या ट्विटचे उदाहरण दिले आहे.  " १५ ऑक्टोबरला राहुल गांधी यांच्या 'OfficeofRG' ट्विटर हँडल वरुन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक ट्विट रिट्विट केले गेले. यामध्ये ट्रम्प यांनी अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबधांची तारीफ केली होती. 'मोदीजी ट्रम्प यांच्यासोबत अजून एक अलिंगन देण्याची गरज आहे' असे रिट्विट 'OfficeofRG' या अकाऊंटवरून करण्यात आले. हे ट्वीट तात्काळ २० हजार वेळा रिट्वीट करण्यात आले होते.


एएनआयने लिहिले, "या ट्विटचा मागोवा घेतल्यानंतर वेगळीच बातमी समोर आली. रशिया, कझाक आणि इंडोनेशियाच्या नागरिकांनी राहुल गांधी यांच्या ट्विटवर हे रिट्विट केल्याचे तपासात समोर आले आहे. रिट्विट करणाऱ्यांचे प्रोफाईल पाहिले असता त्यांचे फॉलोअर्स १० पेक्षाही कमी असल्याचे आढळले. तसेच हे फॉलोअर्स कोणत्याही विचारधारेचे नसून त्यांचे आधीचे रिट्विट हे किरकोळ मुद्यांवर असल्याचेही समोर आले आहे. 


एएनआयच्या या वृत्ताचा हवाला घेऊन भाजपातर्फे कॉंग्रेसवर निशाणा साधला जात आहे. केंद्रीय मंत्री इराणींनी या वृत्ताचा हवाला करत रिट्विट करत म्हटले आहे की, 'कदाचित राहुल गांधी हे रशिया, इंडोनेशिया आणि कझाकस्तान येथे निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत.  #rahulvvekzakh'


भाजपा आयटी सेल प्रभारी अमित मालवीय यांनीही या वृत्ताचा दाखला देत राहुल यांना टार्गेट केले आहे. देशात भलेही युवराजांना कोणीही गांभीर्यांने घेत नसले तरीही रशिया, इंडोनेशिया आणि कझाकिस्तान इथपर्यंत त्यांचे समर्थक पोहोचले आहेत. अमित मालवीय यांनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "बोट्सचा उपयोग हा खेळातील डोपिंग सारखा आहे. राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट मस्करीचा विषय बनले आहे.''


भाजपाच्या या हल्ल्याला उत्तर देताना कॉंग्रेस नेता शहजाद पुनावाला यांनीही मोदींच्या ट्विट्सना रिट्विट करणाऱ्यांचे उदाहरण दिले आहे. 


काय आहे ट्विटरबोट  ? 


ट्विटरबोट हे एक असे सॉफ्टवेअर आहे जे ट्विटर अकाऊंटला ट्विटर एपीआयच्या माध्यमातून नियंत्रित करते. बोट सॉफ्टवेअर स्वत:च रीट्वीट, लाइक्स आणि फॉलो किंवा अनफोलो करण्याची गती वाढविते.  याद्वारे आपला मेसेज इतर कोणत्याही अकाऊंटमध्ये थेट पाठविला जातो.