नवी दिल्ली : भाजपने दिल्लीत मोठा बदल केला आहे. मनोज तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांना पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता आदेश गुप्ता हे दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदेश गुप्ता दिल्लीतील एक मोठं नाव आहे. ग्राऊंड लेवलवर काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते नगरसेवक होते. त्यानंतर ते नॉर्थ दिल्लीचे महापौर देखील होते. दिल्लीच्या राजकारणात त्यांना अनुभव मोठा आहे. पण आदेश गुप्ता हे मनोज तिवारी यांच्या सारखे चर्चेत आलेला चेहरा नव्हते.


आदेश गुप्ता वेस्ट पटेल नगरचे नगरसेवक होते. ते NDMC स्टॅडिंग कमेटीचे सदस्य देखील होते. दिल्लीत भाजपमध्ये बऱ्याच दिवसानंतर बदल करण्यात आला आहे. मनोज तिवारी हे २०१६ पासून दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. २०१७ मध्ये मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात एमसीडी निवडणूक जिंकल्यानंतर फेब्रुवारीमध्ये मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता. (मनोज तिवारींच्या जागी आदेश गुप्तांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी निवड) 


 


लोकसभा खासदार आणि कलाकार म्हणून मनोज तिवारी चर्चेत होते. पण त्यांची जागा घेणारे आदेश गुप्ता दिल्लीच्या राजकारणात चर्चेत नसलेले नेते असले तरी त्यांना आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.