मनोज तिवारींच्या जागी आदेश गुप्तांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी निवड

या कारणामुळे पदावरून हटवलं 

Updated: Jun 2, 2020, 04:42 PM IST
मनोज तिवारींच्या जागी आदेश गुप्तांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी निवड  title=

नवी दिल्ली : दिल्लीचे खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांना मोठा झटका बसला आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मनोज तिवारी यांना पदावरून काढून आदेश गुप्ता यांची दिल्ली प्रदेशाध्यक्ष म्हणून बनवलं आहे. यानंतर छत्तीसगडचे अध्यक्ष विष्णुदेव साय यांनी नियुक्त करण्यात आल. 

मनोज तिवारी यांना कोणत्या कारणाने पदावरून काढण्यात आलं त्याचं कारण अद्याप कळलेलं नाही. दिल्ली भाजप अध्यक्ष पदावरून मनोज तिवारी यांना हटवण्यात येणार आहे. मनोज तिवारींच्या जागी आदेश गुप्ता यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे.  दिल्ली निवडणूकीत पराभव झाल्यामुळे तिवारींना नारळ देण्यात आला आहे. (कोण आहेत दिल्ली भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता?) 

मनोज तिवारी बाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता.  काही दिवसांपूर्वी जेवणाच्या मुद्द्यावरून तिवारी वादग्रस्त बनले होते.  आदेश गुप्ता यांचे व्यापा-यांमध्ये चांगले संबंध आहेत. भाजप मूळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदेश गुप्ता यांचे नाव घोषित करण्यात आलं. गुप्ता एमसीडीमध्ये महापौर राहीले आहेत.

मनोज तिवारी यांना पदावरून काढून आदेश गुप्ता यांची निवड झाली आहे. आदेश गुप्ता एक वर्ष अगोदर उत्तर एमसीडीचे महापौर होते. भाजपकडून व्यापाऱ्यांना खूष करण्यासाठी नवा चेहरा समोर आणला आहे. मनोज तिवारी यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे.  

मनोज तिवारी यांना कार्यकर्त्यांसोबत सोमवारी लॉकडाऊनमध्ये नियमांच उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे अटक करण्यात आली आहे. दिल्लीत कोविड-१९ संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकार फेल ठरलं याविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.