नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर काँग्रेसप्रणि विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI नं विजय मिळवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनच्या (डूसू) अध्यक्ष पदावर NSUIचा रॉकी तुशीद याची निवड करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून या अध्यक्षपदावर भाजपप्रणित विद्यार्थी संघटना ABVP चा विजय कायम होता. त्यामुळे, सतत पराभवाचा सामना करायला लागलेल्या काँग्रेससाठी रॉकी तुशीदनं ही मोठी खुशखबरी दिलीय. 


ABVPचा विजयरथ रोकणाऱ्या रॉकी तुशीद सध्या दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये 'बुद्धिस्ट स्टडीज' पूर्ण करतोय. त्यानं शिवाजी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलंय. 


रॉकी पश्चिम दिल्लीच्या NSUI च्या शाखा आणि फॅकल्टी ऑफ आर्टसचा अध्यक्षही आहे. 


'डूसू'च्या निवडणुकीपूर्वी रॉकीचं नामांकन रद्द करण्यात आलं होतं. परंतु, दिल्ली हायकोर्टाच्या परवानगीनंतर तो पुन्हा एकदा मैदानात उतरलाय. पी. चिदंबरम यांनी कोर्टात रॉकीचा पक्ष मांडला होता.


रॉकी तुशीदनं अध्यक्षपदासाठी १५९० मतांनी विजय मिळवला. तर उपाध्यक्ष पदावार कुनाल सहरावत याला विजय मिळाला.