#DelhiResultOnZee: शाहीन बागमध्ये पाहा कोण आहे आघाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त रंगलेला मुद्दा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओखला मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेत होता. देशभरातील लोकांचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. कारण शाहीन बाग याच मतदारसंघात येतं. त्यामुळे या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.
अपडेट :
दुपारी 2.30 वाजता : आपचे अमानतुल्ला खान 44384 मतांनी सर्वात पुढे होते. त्यांच्या विरोधात मैदानात असलेल्या भाजपच्या ब्रह्म सिंह यांना 7414 मतं तर काँग्रेसच्या परवेज हाशमी यांना 1648 मतं मिळाली आहेत.
10.40 : चौथ्या फेरीत ओखला विधानसभा मतदारसंघातून भाजपला- 7272 मतं, तर आपला -20903 मतं. आप आता 13631 मतांनी आता आघाडीवर
9.40 : ओखला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ब्रह्म सिंह 214 मतांनी आघाडीवर, आपला 3075 तर भाजपला 3289 मते.
9.30 : आम आदमी पक्षाचे उमेदवार अमनातुल्ला खान पिछाडीवर आहेत. भाजपचे ब्रह्म सिंह आघाडीवर
9.00 : आम आदमी पक्षाचे अमनातुल्ला खान आघाडीवर
शाहीन बागमध्ये गेल्या २ महिन्यांपासून सीएए-एनआरसी विरोधी आंदोलन सुरु आहे. भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीत शाहीन बागचा मुद्दा सर्वात वर होता. मागच्या निवडणुकीतही या जागेवर आपचे अमनातुल्ला जिंकले होते.
भाजपकडून ब्रह्म सिंह, आपचे अमानतुल्लाह खान आणि काँग्रेसचे परवेज हाशमी या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. अमानतुल्लाह खान यांनी २०१५ मध्ये आपमधूनच येथे विजय मिळवला होता.
+<iframe width="560" height="350" src="
https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
+