नवी दिल्ली : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साध्वीच्या बलात्काराखाली आरोपी राम रहीमला दोषी ठरवलं आहे. यानंतकर आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. राम रहीमकडे कोटींची संपत्ती होती. एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे सिरसामध्ये ७०० एकरवर शेत, २५० आश्रम, आय बँक, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. त्याची एक दिवसाची कमाई १६ लाख रुपये आहे. आता जर राम रहिमला शिक्षा झाली तर त्याच्या जागी त्याचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहिमच्या कुटुंबामध्ये त्याचा एक मुलगा जसमीत सिंह, दोन मुली चरणप्रीत आणि अमनप्रीत आणि एक दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत आहे.


प्रमुखाचा मुलगा असल्याच्या कारणामुळे डेराचा उत्‍तराधिकारी बनण्याचा सर्वात आधी अधिकार जसमीतला मिळू शकतो. गुरमीतने 2007 मध्ये जसमीत इंसाला आपला उत्तराधिकारी बनवण्याची घोषणा केली होती.जेव्हा सीबीआयने गुरमीतविरोधात चार्जशीट दाखल केली होती. पण हे इतकंही सोपं नसणार आहे. कारण डेराचा एक नियम आहे की पुढचा प्रमुख हा सध्याच्या प्रमुखाच्या कुटुंबातला नसला पाहिजे. त्यामुळे जसमीतच्या नावावर शंका आहे.


दुसरं नाव आहे राम रहिमची खास शिष्‍य विपसना. ३५ वर्षाची गुरु ब्रह्मचारी विपसना अनेक वर्षांपासून डेराशी जुळलेली आहे. विपसना डेरामध्ये दुसऱ्या स्थानावर मानली जाते. विपसना ही ग्रज्यूएट आहे. विपसनाच्या हाताखाली २५० लोकांची टीम काम करते. ज्यामध्ये १५० महिला आहेत.


विपसनाला जर डेराचं प्रमुख नाही बनवलं गेलं तर मग राम रहिमची दत्तक घेतलेली मुलगी या यादीत आहे. हनीप्रीत ही अटक झाली त्या दिवशी सुद्धा राम रहिमच्या सोबत होती. हनीप्रीतही विपसना साररखीच गुरु ब्रह्मचारी आहे. ती मागील ७ वर्षापासून राम रहिमच्या सोबत आहे. राम रहिमच्या सिनेमामध्ये देखील तिने काम केलं आहे. रहिमच्या कुटुंबातली नसल्यामुळे तिच्यावर तो नियम देखील लागू नाही होणार.