Rajasthan Exit Poll : राजस्थानमध्ये कॉग्रेस परंपरा मोडणार? एक्झिट पोलमध्ये भाजपला `इतक्या` जागा!
Rajasthan Exit Poll 2023 in Marathi: राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 200 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 73 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
Rajasthan Exit Poll Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. 25 नोव्हेंबरला जनतेने दोन्ही पक्षांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब केलंय. अशातच आता राजस्थानचा एक्झिट पोल समोर आला असून राज्यात चुरशीची लढाई पहायला मिळत आहे.
कोणाला किती जागा मिळणार?
पोल स्ट्रॅटच्या सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. तेथे भाजपला 100 ते 110 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळू शकतात. इतरांना 5 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी भाजपला 135 हून अधिक जागांवर दावा केला आहे. जोशी म्हणाले की, काँग्रेसच्या जागा 50 पेक्षा कमी असतील. काँग्रेसचे सरकार पुन्हा येईल. निवडणुकीत आम्ही धर्माचे पत्ते खेळले गेले नाहीत त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा सरकार स्थापन करत आहे, असं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 200 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 73 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे 2013 साली भाजपने दणदणीत विजय मिळवला आणि 200 पैकी 163 जागा जिंकल्या.
दरम्यान, राजस्थानमध्ये असं मानलं जातं की तेथील लोक कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी देत नाहीत. यंदाही ही परंपरा कायम राहणार की या वेळीही नवा विक्रम होणार? असा सवाल आता विचारला जात आहे.