मुंबई : प्रत्येक जण कोणत्याही गोष्टीवर ओके (OK) म्हणतो.  आपण फक्त कामाच्याचं ठिकाणी नाही तर मित्रांमध्ये  आणि कुटुंबासोबत  देखील ओके या शब्दाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर करतो. कोणत्याही गोष्टीला होकार किंवा नकार देण्यासाठी लहान मुलांपासून  वृद्धांपर्यंत ओके शब्दाचा वापर होतो. पण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमागे इतिहास असतो. त्याचप्रमाणे 'ओके' या शब्दामागे देखील एक इतिहास दडलेला आहे. फार कमी लोकांना या शब्दाचा अर्थ आणि फुल फॉर्म माहिती असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आज आपण जाणून घेवू नक्की या शब्दाचा अर्थ काय आहे. 'ओके' शब्द इंग्रजी आहे. OK चा फुल फॉर्म आहे 'Olla Kalla'. हा एक ग्रीक शब्द आहे. ज्याचा अर्थ आहे बरोबर. ओके शब्दाची उत्पत्ती 182 वर्षांपूर्वी अमेरिकी पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीकच्या ऑफिसमधून झाली. 1839 मध्ये लेखकांनी काही कारण नसताना शब्दाला संक्षिप्त केलं. 


ज्याप्रमाणे आज आपण LOL, OMG, किंवा  NBD असे शब्द वापरतो. ओके शब्दाचा वापर पहिल्यांदा 'Oll Korrect' च्या रूपात वापरण्यात आला. चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांनी व्याकरणावर उपहासात्मक लेख लिहिला आणि 1839 मध्ये बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झाला.


ओके हा शब्द 1840 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष मार्टिन व्हॅन ब्यूरन यांच्या निवडणूक प्रचारात देखील वापरला गेला. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या व्हॅन ब्यूरन यांचे टोपणनाव 'ओल्ड किंडरहूक' होते, ज्यामुळे लोक त्यांना ओके म्हणून ओळखायचे. जे जगभर लोकप्रिय झाले. त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारादरम्यान रॅलींमध्ये "ओके" शब्द  वापरला. एवढेच नाही तर देशभरात 'ओके क्लब' देखील तयार करण्यात आला.