...म्हणून १५ जानेवारी हा लष्कर दिन म्हणून साजरा होतो
नवी दिल्लीत गॅरीसन मैदानात लष्करातर्फे सुंदर संचलन आणि प्रात्यक्षिकं
नवी दिल्ली : आज ७२ वा आर्मी डे साजरा केला जातोय. स्वातंत्र्यानंतर १९४९ साली फिल्ड मार्शल करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून १५ जानेवारीला पदभार स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. नवी दिल्लीत गॅरीसन मैदानात लष्करातर्फे सुंदर संचलन आणि प्रात्यक्षिकं सादर केली जातात.
लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना लष्करातर्फे सलामी दिली जाईल. लष्कर दिनाच्या पूर्वसंध्येला जनरल नरवणे यांनी लष्करी जवानांना संदेश दिला. चीन आणि पाकिस्तान यांच्यातर्फे सुरू असलेल्या आगळिकींना तोंड देण्यासाठी लष्कराने २४ तास सतर्क राहावं असं नरवणे म्हणाले. जवानांच्या सर्व गरजा विना विलंब पूर्ण केल्या जातील असा विश्वासही नरवणे यांनी दिला.
आर्मी मॅन हे खरे हिरो आहेत. एकतर आम्ही तिरंगा फडकावून येऊ किंवा तिरंग्यात लपेटून येऊ. पण आम्ही येऊ हे नक्की आहे. त्यामुळे लष्करी जवानांच्या शौर्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही असे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी म्हटले. आपण जेव्हा आपले कुटुंब, मित्रपरिवार यांच्यासोबत सुट्टी एन्जॉय करत असतो. तेव्हा जवान अनेक आपत्तींवर मात करत पाय रोऊन उभा असतो. देशाचे नागरित सुरक्षित राहावेत यासाठी जवान कडाक्याची थंडी, उष्ण तापमान अशा परिस्थितीत उभा असतो.