Railway Stations Name in Black Colour on Yellow Board: देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं असून लाईफलाईन बोललं जातं. भारतीय रेल्वेने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगतीला वेग दिला. जगात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तर आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. रेल्वेने दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक होते. भारतीय रेल्वेची 300 रेल्वे यार्ड, 700 दुरुस्ती केंद्रे आहेत.  रेल्वे वाहतूक (Railway Travel) इतर प्रवासाच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. तुम्हीही कधी ना कधी रेल्वेनं प्रवास केला असेलच. रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, रेल्वे स्टेशनची नावं कायम पिवळ्या रंगाच्या बोर्डवर (Yellow Sign Board) काळ्या रंगाने लिहिलेलं असतात. असं एखाद दोन स्टेशनच्या बाबतीत नाही तर देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकांची नावं अशी लिहिलेली असतात. त्यामुळे एकाच पॅटर्नमध्ये का नावं लिहिली जातात? असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला यामागचं कारण माहिती नसेल तर जाणून घेऊयात. 


यासाठी असतो पिवळा बोर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिवळ्या रंगाचा बोर्ड सूर्याच्या प्रकाशावर आधारित असतो.पिवळा रंग सूर्याइतकाच प्रभावी मानला जातो. पिवळा रंग आनंद, बुद्धीमत्ता आणि उर्जेशी संबंधित आहे. त्यामुळे पिवळ्या रंगावर लगेच नजर पडते. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी स्पष्टपणे दृश्यमान असतो. गर्दीच्या ठिकाणी पिवळा पार्श्वभूमी असलेला बोर्ड इतर रंगांपेक्षा चांगले कार्य करते. त्यामुळे स्थानकांची नावे पिवळ्या फलकावर लिहिली जातात.


म्हणून काळ्या रंगात असतात अक्षरं


पिवळ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगाने रेल्वे स्थानकांची नावं लिहिलेली असतात. कारण ही नावं दूरवरून स्पष्टपणे पाहिले जाऊ शकतात. इतकंच काय तर रस्त्यांवरील अनेक सूचना फलक हे देखील पिवळ्या रंगाचे असतात, ज्यावर ते काळ्या रंगात लिहिलेले असते. त्यामुळे रेल्वे स्थानकाचं नाव प्रभावीपणे दिसते.


बातमी वाचा- Personal Loan घेण्यापेक्षा हे पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी


बोर्ड बजवतात महत्त्वाची भूमिका


रेल्वे स्थानकावरील पिवळा फलक रेल्वे चालकाला सतर्क करण्याचे काम करतो. अनेक गाड्या नॉन स्टॉप असतात आणि प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. चालकाला पिवळा रंग लांबूनच दिसतो. त्यामुळे स्टेशन जवळ आल्याचं कळतं आणि वाहनचालक सज्ज राहतो. पिवळा रंग चालकाला सांगतो की पुढे स्टेशन आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ते जास्त लक्ष देतात.