Knowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
Indian Railway Interesting Fact: भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात चौथं स्थान असून संपूर्ण देशात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वेला लाईफलाईन मानलं जातं. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने प्रवासी ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात.
Indian Railway Interesting Fact: भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात चौथं स्थान असून संपूर्ण देशात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वेला लाईफलाईन मानलं जातं. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने प्रवासी ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात. लाखो प्रवासी रेल्वेतून दररोज प्रवास करत असतात. भारतात जवळपास 52 टक्के ट्रेन डिझेलवर धावतात. पण रेल्वेतीन अनेक बाबी प्रवाशांना माहिती नसतात. या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. रेल्वेच्या डब्ब्यांवर असलेल्या खुणा बरीच माहिती देत असतात. रेल्वेच्या डब्ब्यांवर असलेली गोल झाकणंही विशेष कारणासाठी असतात. ट्रेनच्या डब्ब्यांवर असलेली झाकणं कशी काम करतात जाणून घेऊयात.
ट्रेनच्या डब्ब्यावर या कारणासाठी असतात झाकणं
ट्रेनच्या डब्ब्यांवरील गोल झाकणं रूफ व्हेंटिलेशनचं (Roof Ventilation) काम करतात. ट्रेनच्या डब्ब्यात प्रवाशांची संख्या जास्त असल्यास उकडा वाढतो. त्यामुळे काही प्रवाशांना अस्वस्थ वाटू शकतं. गरमी आणि सफोकेशन मेटेंन करण्यासाठी ही व्यवस्था केलेली असते. जर डब्ब्यांवर ही व्यवस्था नसती तर ट्रेनमधून प्रवास करणं कठीण झालं असते. एकीकडे गाड्यांच्या छतावर गोल झाकण बसवलेली असताना डब्याच्या आत छतावर जाळी असते. तर काही डब्ब्यांच्या आत छिद्रे असतात. त्यांच्या मदतीने डब्यातील गरम हवा आणि वाफ बाहेर येते. गरम हवा नेहमी वरच्या दिशेने जाते, त्यामुळे कोचच्या आतल्या छतावर होल प्लेट्स बसवल्या जातात.
ट्रेनमध्ये प्लेट्स आणि जाळ्या बसवण्यामागे आणखी एक कारण आहे. या प्लेट्सच्या माध्यमातून कोचच्या आतील गरम हवा तर बाहेर येतेच, पण त्याचबरोबर पावसाचे पाणीही डब्याच्या आत येत नाही.
Credit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
एक ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो?
ट्रेनमध्ये वीज, पाणी, वॉशरुम, फॅन, एसी यासारख्या सुविधा असतात. त्याचबरोबर इंजिन आणि कोच देखील असतो. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेचं इंजिन तयार करण्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये खर्च येतो. या ट्रेन भारतात तयार केल्या जातात असल्याने यामुळे खर्च जास्त येत नाही. भारतात दोन पद्धतींचं इंजिन तयार केलं जातं. यात इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनचा समावेश आहे.