What is difference between credit score, cibil score and cibil report: तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याबाबत छोट्यातली छोटी बाब माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरण्याऱ्यांचा क्रेडिट रिपोर्ट तयार होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांना टर्म्स अँड कंडिशन माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर (Credit Score), सिबिल स्कोअर (CIBIL Score) आणि सिबिल रिपोर्ट (CIBIL Report) हे तीन शब्द वाचायला जरी एकसारखे वाटत असले तरी त्याचा त्या प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. तुम्हीही या शब्दांबाबत कन्फ्यूज असाल तर या तिघांमधील फरक समजून घ्या. यामुळे तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. सिबिल स्कोअर मागच्या 24 महिन्यावर व्यवहारांवर कॅलक्युलेट केला जातो. तर सिबिल रिपोर्ट 36 महिन्याच्या हिस्ट्रीवर आधारित असतो.
क्रेडिट स्कोअरवरून एखाद्या व्यक्तीची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता कळते. तुम्ही तुमचं आर्थिक गणित व्यवस्थित ठेवून कर्ज कसं फेडता यावरून क्रेडिट स्कोअर ठरतो. क्रेडिट हिस्ट्री आणि रेकॉर्डद्वारे हे निश्चित केलं जातं. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही दिलेले कर्ज वेळेत फेडता. क्रेडिट स्कोअर आणि CIBIL स्कोअरमध्ये फक्त हा एकच फरक आहे.
क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) क्रेडिट स्कोअर देणारी संस्था आहे. ही प्रतिष्ठित क्रेडिट इन्फोर्मेशन कंपनी असून सिबिल स्कोअर संपूर्ण देशात ग्राह्य धरला जातो. सिबिल स्कोअर तीन डिजिटमध्ये असतो. यावरून क्रेडिट हिस्ट्री, रिपोर्ट आणि रेटिंग निश्चित केली जाते. 300 ते 900 गुणादरम्यान सिबिल स्कोअर ठरवला जातो. जितके अधिक गुण तितका आपल्याला फायदा होतो.
सिबिल रिपोर्ट एक प्रकारे क्रेडिट रेकॉर्ड आणि क्रेडिट हिस्ट्रीचा पूर्ण लेखाजोखा ठवेतं. यामध्ये आउटस्टँडिंग लोन पेमेंट, लोन अमाउंट बाबत माहिती दिलेली असते. या रिपोर्टमध्ये नाव, पॅनकार्ड, पत्ता यासारखी पर्सनल माहितीही असू शकते.
Loan EMI भरण्यासाठी बँक एजंट तुम्हाला धमकवू शकत नाही, जाणून घ्या नियम
क्रेडिट स्कोअर तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता दाखवते. सिबिल स्कोरमध्ये तुम्हाला रेटिंग दिलं जाते. त्यामुळे कर्ज घेताना मदत होते. तर सिबिल रिपोर्टमध्ये क्रेडिट हिस्ट्रीचा पूर्ण लेखाजोखा असतो.