Toilet Flush Tank : दैनंदिन वापरात अशा अनेक वस्तु डोळ्यासमोर येतात. यापैकी अनेक वस्तू पाहून आपल्याला प्रश्न पडतो की याचा वापर काय? अशीच एक वस्तु आहे ती म्हणजे  टॉयलेट फ्लश टॅंक(Toilet Flush Tank).  टॉयलेटच्या फ्लशमध्ये एक मोठे आणि एक लहान बटण असते. या बटनाची रचना अशी असते या मागचे इंटरेस्टींग कारण समोर आले आहे (toilet interesting facts). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातील टॉयलेट पासून ते अगदी कॉर्परेट ऑफिससह मॉलमधील टॉयलेट्सची रचना वेगवेगळी असते. मात्र, यात गोष्ट कॉमन असते ती म्हणजे टॉयलेट फ्लश टॅंक. सर्वच ठिकाणी टॉयलेट फ्लश टॅंकवर एक मोठे आणि एक लहान बटण दिसते. या बटणांचा योग्य रीतीने वापर केला तर हजारो लिटर पाण्याची बटत होऊ शकते. 


टॉयलेट फ्लश टॅंकवर दोन प्रकारची बटणे असतात. ही दोन्ही बटणे एक्झिट व्हॉल्व्हला जोडलेली असतात. मोठे बटण दाबून सुमारे 6 लिटर पाणी सोडले जाते, तर लहान बटण दाबून 3 ते 4.5 लिटर पाणी सोडले जाते. याच बटणाचा वापर करुन पाण्याची बचत करता येवू शकते. 
अशी होते पाण्याची बचत


घरामध्ये सिंगल फ्लशऐवजी ड्युअल फ्लशिंगचा अवलंब केल्यास वर्षभरात सुमारे 20 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते. अमेरिकन औद्योगिक डिझायनर व्हिक्टर पापानेक यांच्या संकल्पेतून ही फ्लश बटण अस्तित्वात आले आहे. 1976 मध्ये व्हिक्टर यांनी त्यांच्या 'डिझाइन फॉर द रियल वर्ल्ड' या पुस्तकात या संकल्पनेचा उल्लेख केला होता. फ्लशच्या वापरामुळे हजारो लिटर पाण्याची बचत होण्यास मदत होते.