... म्हणून पंचतारांकित हॉटेल्समधून टबबाथ हटणार
दुबईमध्ये भारतीय अभिनेत्रीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याने आता बाथटबचा वापर किती सुरक्षित आहे? याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.
मुंबई : दुबईमध्ये भारतीय अभिनेत्रीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याने आता बाथटबचा वापर किती सुरक्षित आहे? याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.
भारतामधील अनेक मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्येही 'टबबाथ' ही आवश्यक वस्तू मानली जाते. मात्र आता जगभरातील टबबाथमुळे होणार्या मृत्यूंचा आकडा पाहता टबबाथ हटवण्याची चिन्हं दिसत आहेत.
टबबाथ हटवण्याचं कारण काय ?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ताज, ऑबेरॉय, आयटीसी सारख्या अनेक मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधील बाथरूम कॉन्फिगरेशनचे पुर्नमुल्यांकन करण्यात येणार आहे.
बाथटबची खरंच गरज आहे का ? हे तपासून पाहिले जाणार आहे. तसेच लवकर आंघोळ उरकण्याच्या घाईत असलेल्या कस्टमर्सनाअ लक्षात घेऊन नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
शॉवर सुविधेला अधिक चालना देणार
शॉवर सुविधा ही बंगळूरूतील नोवेटेल, मुंबईतील ताज, विवांता सारख्या मोठ्या हॉटेल्समध्ये आहे. तर जयपूरमधील फेअरमोन्ट, केरळातील ताज कुमारकम यासारख्या प्रशस्त हॉटेल्समध्ये टबबाथची सोय आहे.
या हॉटेलमध्ये नसणार बाथटबची सुविधा
मेरिएट किंवा हिल्टन यासारख्या हॉटेल्समध्ये बाथटबची सोय बंद करण्यात आली आहे. ऑबेरॉयच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी प्रोजेक्ट्समध्ये बाथटबच्या वापरावर विचार केला जाईल.
पाण्याचे नुकसान टळणार
एक्कोर हॉटेलचे वाईस प्रेसिडंट शिव कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथटब हटवल्याने पाण्याची बचत होईल. बाथटबच्या वापरामुळे एक व्यक्ती सुमारे 370 लीटर पाण्याचे नुकसान करते तर शॉवर बाथमुळे 70 लीतर पाण्यामध्ये काम होते. टबबाथमुळे जागादेखील खूप प्रमाणात वाया जाते.