Interesting Facts about Yoga : मानवी शरीर (Human Body) हे जणू काही एक अशी कल्पना आहे, जी सत्याता उतरलेली पाहणंही भाग्याची बाब. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं, त्या शरीराची ठेवण आणि सहनशक्तीही तितकीच वेगळी. कोणत्या गोष्टीत साम्य असतं, तर ते म्हणजे एखादी दुखापत झाल्यास त्यावर येणारी प्रतिक्रिया. अनावधानानं तुम्ही कधी कोणत्या अशा वस्तूवर आदळला आहात का, ज्यामुळं तुम्हाला जोरदार फटका बसलाय? भींतीला पायच आपटला, दाराला कोपर आपटलं, डोक्याला फळी लागली या आणि अशा अनेक लहानमोठ्या इजा आपल्याला दैनंदिन आयुष्यात होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रत्येक दुखापतीनंतर आपली प्रतिक्रिया काय असते बरं? आई गं...., आsssऊच, आsss.... वगैरे वगैरे. तुम्हीही असाच एखादा सूर लावत कळवळता ना? पण, हे असं नेहमी का होतं बरं विचार केलाय का कधी? 


तुमचा मेंदूही एक चमत्कार... (brain)


ज्याप्रमाणं तुमचं शरीर एक चमत्कार असतं, त्याचप्रमाणं तुमचा मेंदूही चमत्कारच आहे हे विसरु नका. जेव्हाही तुम्ही हाताचं कोपर, ढोपर किंवा इतर कोणताही अवयव दरवाचा, दाराची चौकट किंवा एखाद्या कोपऱ्यावर आदळल्यानं दुखापतग्रस्त होतो तेव्हा तुम्ही अक्षरश: कळवळता. अधिक सोपं सांगावं तर तुम्ही एक दीर्घ उच्छ्वास सोडता. हे कोणत्याही हेतुशिवाय केलं जातं. तर मग आपण असं समजावं का, की दीर्घ श्वास हा आपल्या शरीरानं दिलेल्या प्रतिक्रियेचाच भाग आहे? 


हेसुद्धा वाचा : Loo Break : 'शू'ला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात, कधी विचार केलाय का?


सतर्क राहून केलेला (Exhale) दीर्घ उच्छ्वास cerebral cortex या घटकाकडून वेदनेच्या प्रतिबंधात्मक आवेगाला वेदनेच्या आणि मेंदूच्या केंद्रस्थानी आणतं. कालांतरानं तोंडावाटे करण्यात आलेल्या स्वरामुळं भावना व्यक्त होऊन दुखापत झालेला भाग शांत होतो. याचा परिणाम म्हणजे वेदना कमी होते किंवा नाहीशी होऊन काहीसा आराम मिळतो. योगाभ्यासानुसार सांगावं तर याला (NIRVANA Pranayama ) निर्वाण प्राणायाम असंही म्हणतात. जिथं तुम्ही श्वासोच्छवासाची प्रक्रिया नेहमीच्या वेगानं किंवा दुप्पट वेगानं करता. 


याचे फायदेही अनेक.... 


निर्वाण प्राणायामामुळं तणाव, सततची भीती कमी होते. (blood pressure) रस्कदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ही प्रक्रिया फायद्याची ठरते. तर, (Heart Disease) हृदयविकार आणि दम्याचा त्रास (Asthama) असणाऱ्यांसाठीसुद्धा ही क्रिया फायद्याची ठरते. इतकंच नव्हे तर इन्सोम्निया (Insomnia) असणाऱ्यांसाठीही ही प्रक्रिया प्रचंड फायद्याची ठरते. 


कधी करावा NIRVANA Pranayama ? 


नकारात्मक वाटू लागल्यास प्राणायामाचा हा प्रकार तुम्ही करू शकता. यासाठी एखादी अशी जागा निवडा, जिथं तुम्ही मांडी घालून पाठीचा (Spine) कणा ताठ ठेवून व्यवस्थित बसू शकता. प्राणायामाची ही प्रक्रिया करताना 2/4 सेकंदांसाठी (Inhale Exhale) श्वास घ्या आणि दुप्पट वेगानं श्वास सोडा. दर दिवशी 5 ते 10 मिनिटं ही प्रक्रिया करणं शरीरासाठी फायद्याचं ठरेल.