मुंबई: सलमान खान आणि भाग्यश्री यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मैंने प्यार किया' चित्रपटात चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील गाणी, संवाद सर्व काही प्रेक्षकांना भावलं होतं. पण या व्यतिरिक्त कबुतरांद्वारे केलेला पत्रव्यवहार प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, पुरातन काळात पत्रव्यवहारासाठी कबुतरांची निवड का केली जायची? अनेक पक्षी हवेतून उडतात. पोपट किंवा इतर पक्ष्यांची निवड का केली जात नव्हती? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रव्यवहारासाठी कबुतराची निवड करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की कबूतराच्या शरीरात अशी कार्यक्षमता असते जी त्याच्यासाठी जीपीएस सारखी काम करते. यामुळेच कबुतर आपला मार्ग कधीच विसरत नाही. कबुतरांमध्ये मार्ग शोधण्यासाठी मॅग्नेटो रिसेप्शन कौशल्य आहे. अशा परिस्थितीत कबुतरांना पत्ता सहज सापडतो. याशिवाय कबुतरामध्ये 53 विशेष पेशी आढळतात, जे त्याच्यासाठी सूचक म्हणून काम करतात.


कबुतराच्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये एक विशेष प्रकारची प्रथिने देखील आढळतात. हेच मुख्य कारण आहे की पूर्वीच्या काळी फक्त कबुतरांचाच उपयोग पत्रे पोचवण्यासाठी केला जायचा.