Apna.co द्वारे अलीकडेच एक सर्वेक्षण केले आताच्या काळातील नोकऱ्यांच्या बाजारपेठातील लँडस्केप, कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि प्रादान्यावर प्रकाश टाकला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सर्वेक्षण ऑनलाईन केला असून यामध्ये 10 हजाराहून अधिक प्रोफेशनल कर्मचारी आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या देशात काम करत आहेत. या सर्वेक्षणातून नोकऱ्या आणि एप्रिल-मार्चमध्ये होणाऱ्या अप्रायझलबाबतही सर्वेक्षण केला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वेक्षणात झालेल्या खुलासानुसार, 54 टक्के कर्मचारी आपल्या करिअरच्या ग्रोथनुसार एकाच ठिकाणी काम करण्याचा विचार करतात. यामध्ये पगार हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा असतो. याचा अर्थ असा होतो की, कर्मचारी त्यांच्या आताच्या कंपनीमध्येच व्यावसायिक वाढ आणि विकासाचे ध्येय ठेवत आहेत.


करिअरच्या ग्रोथसोबतच इतर अनेक मुद्दे या सर्वेक्षणात समोर आले आहेत. 37 टक्के लोकांनी सांगितले की जुन्या कंपनीत मिळणारे कामाचे स्वातंत्र्य आणि कम्फर्टझोन. 21 टक्के लोकांना आंतरराष्ट्रीय असाइनमेंट किंवा कामाशी संबंधित प्रवास करण्यात अधिक रस असतो. ही संधी त्यांना आपल्या आता काम करत असलेल्याच कंपनीत मिळेल असा विश्वास असतो. 


सर्वेक्षणात असेही आढळून आले की, 44 टक्के कर्मचाऱ्यांनी ते आता काम करत असलेल्या संस्थेमधील कामाच्या पद्धतीवर भर दिला. याचा अर्थ असा की, कर्मचारी काम करत असताना नॉन टॉक्सिक आणि सकारात्मक वातावरणाचा विचार करतात. जो त्यांना जुन्या कामात अनेकदा मिळतो. 


Apna.co चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निर्मिती पारीख यांच्या म्हणण्यानुसार, "हा अहवाल आजच्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या विकसित आकांक्षा आणि प्राधान्यांवर प्रकाश टाकतो." अनेक कर्मचारी त्यांच्याच कंपनीत काम करुन इच्छितात असा एक वर्ग आहे. हे कर्मचारी प्रामुख्याने करिअरच्या प्रगतीच्या संधी, कामाची पद्धत आणि कामाच्या विकासाची इच्छा यासारख्या घटकांवर आधारित असतात.


Apna.co ने आपल्या सर्वेक्षण अहवालात असे आढळून आले की, सुमारे 54 टक्के कर्मचारी त्यांच्या संस्थेतील लिडरशिपला आणि जबाबदाऱ्यांना महत्त्व देतात. 40 टक्क्यांनी प्रगत प्रशिक्षणाला प्राधान्य दिले, तर 36 टक्क्यांनी उद्योग तज्ज्ञ किंवा वरिष्ठ नेतृत्वाला प्राधान्य दिले. या सर्वेक्षणातून आणि रिपोर्टमधून ही गोष्ट अधोरेखित झाली आहे की, संस्थांमुळे कर्मचाऱ्यांच्या विकासाला प्राधान्य मिळते. एवढेच नव्हे तर कंपन्यांमधील सकारात्मक आणि नॉन टॉक्सिक कामाची पद्धत कर्मचऱ्यांना उत्तम प्रकारे काम करण्याची संधी देते. यामुळे कर्मचाऱ्यांना देखील उत्तम प्रकारे काम करण्याची संधी मिळते.