जगभरातील अनेक नामांकित कंपन्या Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरी देत नाही. 1990 दशकाच्या शेवटी किंवा 2000 दशकाच्या सुरुवातीला जन्माला आलेली मुलं Gen Z म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, इंटरनेटसोबत मोठी होणारी ही पिढी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही पिढी जोश आणि उत्साहाने भरलेली आहे पण कंपन्या या मुलांना काम देण्यास नकार देतात. 


युवांना का कामावर ठेवत नाहीत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Gen Z बाबत झालेल्या नव्या सर्वेक्षणात सांगितलं आहे की, जगभरात अनेक नामांकित कंपन्या Gen Z ला काम देत नाही. एवढंच नव्हे तर काही कंपन्या नोकरी देतात पण त्यांना काही महिन्यातच काढून टाकतात. कंपन्यांच असं म्हणणं आहे की, नुकतेच कॉलेजमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीवर ठेवायला घाबरतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत, कम्युनिकेशन स्किल आणि कामाप्रती असलेला बेजबाबदारपणा पसंत नाही. 


इंटेलिजेंट डॉट कॉमद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, 10 मे पासून सहा रिक्रूटर्सनी सांगितले की, यावर्षी अनेक कॉलेजमधून पास झालेल्या मुलांना नोकरीवरुन काढलं आहे. तर काही रिक्रूटरने सांगितलं की, आपल्या कंपनीत नव्या ग्रॅज्युएट्सला कामावर ठेवलं जात नाही. 


काय म्हटलं रिपोर्टमध्ये? 


Gen Z at Workplace नावाच्या या अहवालात असे म्हटले आहे की जनरेशन Z तरुणांपैकी 45 टक्के तरुण दोन वर्षांत नोकरी सोडण्यास तयार आहेत. तर 51टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्यामध्ये करिअरची भीती निर्माण करते. कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.


तरुणांमध्ये प्रोफेशनलिझमची कमतरता 


आताच्या अनेक तरुणांमध्ये प्रोफेशनलिझमची कमतरता आहे. तसेच कामाप्रती असलेला वक्तशीरपणा किंवा आत्मियता या मुलांमझध्ये कमी पाहायला मिळते. अनुभव कमी असला तरी त्यांचा अति आत्मविश्वास हा घातक ठरु शकतो. 


Gen Z कोण? 


इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार, जनरेशन झेड म्हणजे 1995 च्या मध्यापासून 2010 च्या मध्यापर्यंत जन्मलेले लोक. अशा लोकांना स्वतःशीच राहायला आवडते. तसेच जनरेशन Z ही इंटरनेट जगताशी खूप परिचित आहे आणि त्याला 'डिजिटल नेटिव्ह' म्हणतात.