General Coaches Indian Railway: जनरल श्रेणीचे डबे हे ट्रेनच्या अगदी शेवटी किंवा पुढे का असतात?
Why General Coaches Are Always Placed At The End Of A Train: इंजिन, एसी-3, एसी-2, स्लीपर कोच आणि नंतर जनरल डबे अशाच क्रमात सामान्यपणे ट्रेनचे डबे जोडले जातात. पण असं का यामागे एक खास कारण आहे.
Why General Coaches Are Always Placed At The Beginning Or The End Of A Train: भारतामधील रेल्वे (Indian Railway) नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. लाखो लोक रोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करताना प्रवाशांची सुरक्षा अन्य सुविधांवरही रेल्वे प्रशासनाला लक्ष ठेवावं लागतं. अनेकांना असा प्रश्न पडतो की लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डबे (General Coaches) हे मागच्या बाजूलाच का असतात? हे जनरल डबे रेल्वेच्या मध्यभागी का नसतात? रेल्वेने या या डब्यांची जागा एका विशिष्ट कारणामुळे गाडीच्या मागच्या बाजूला ठेवली आहे. रेल्वेगाडीमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डब्बे जोडतानाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेला विशेष महत्त्व दिलं जातं.
गरीबांना त्रास व्हावा म्हणून अशी रचना असल्याचा आरोप
प्रत्येक ट्रेनची रचना जवळजवळ सारखी असते असते. म्हणजे इंजिन त्यानंतर एसी-3, एसी-2, स्लीपर कोच असे विशेष डबे आणि ट्रेनच्या शेपटाकडे म्हणजेच शेवटी जनरल डबे. जनरल डबे कायम रेल्वेच्या एकदम पुढे किंवा अगदी मागे जोडले जात असल्याच्या मुद्द्यावर प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे हे असा आरोपही केला. ट्विटरवर त्याने आरोप केला आहे की रेल्वेचे जनरल डबे हे ट्रेनच्या एकदम पुढे किंवा मागे जोडले जातात. म्हणजेच दुर्घटना झाल्यास गरीब प्रवाशांना नुकसान व्हावं या हेतूने अशी रचना असते असा आरोप या व्यक्तीने केला.
रेल्वेनं काय म्हटलं आहे?
मात्र या व्यक्तीने केलेले हे आरोप रेल्वेने फेटाळून लावले. ट्रेनसंदर्भातील नियमावलीनुसार प्रत्येक डब्याची जागा ठरलेली असते. यामध्ये डब्यांची श्रेणी महत्त्वाची नसते, असं रेल्वेनं म्हटलं आहे.
ट्रेनचे जनरल डबे शेवटी किंवा सुरुवातीलाच असण्याचं हे आहे खरं कारण
जनरल डब्यांना प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने डब्यांचा क्रम ठरतो. तसेच जनरल डबे ट्रेनच्या अगदी पुढे किंवा मागे जोडले जातात. कोणत्याही ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये जास्त गर्दी असते. त्यामुळे जनरल डबे रेल्वेच्या मध्यभागी जोडल्यास ट्रेनच्या मध्य भागावर जास्त वजन होणार आणि ट्रेनचं संतुलन राहणार नाही. असं झाल्यास बोर्डींग-डीबोर्डींगलाही अडचण येणार. जनरल डबे मध्यभागी असल्यास सिटींग अरेंजमेंटबरोबरच इतर व्यवस्थांवरही परिणाम होईल. जनरल डबे मध्यभागी सोडल्यास सामान आणि प्रवाशांना दोन्ही दिशांना नेता येणार नाही. त्यामुळेच जनरल डबे सर्वात आधी किंवा नंतर जोडले जातात. परतीच्या प्रवासामध्ये कोणत्याही बाजूने इंजिन जोडल्यास ट्रेनचं बॅलेन्स कायम राहण्यासाठी फायदा होता.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं
रेल्वेसंदर्भातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जनरल डबे ट्रेनच्या सुरुवातीला किंवा शेवटी जोडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायदा होतो. असं झाल्यास जनरल डब्यांमध्ये बसलेले जास्त लोक हे इतर डब्ब्यांपासून काही अंतराव असतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ज्यामध्ये अपघात, रेल्वे रुळावरुन उतरणे किंवा आग लागल्यासारख्या घटनांच्या वेळी मोठ्या संख्येनं प्रवासी असलेल्या या डब्यांमधून लोकांना लवकरच बाहेर काढता येतं.