Flight Mode On Plane: तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर तुम्हाला काही सूचनांचं पालन करावं लागतं. अशीच एक सूचना विमान उड्डाण करण्यापूर्वी केली जाते. तुम्हाला तुमचा मोबाईल फोन फ्लाईट मोडवर (Flight Mode) ठेवण्यास सांगितलं जातं. यावेळी प्रवाशांनी मोबाईल फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवणे आवश्यक आहे आणि त्याबद्दल विमानाच्या आत घोषणा केली जाते. फ्लाइट मोडमध्ये फोन चालू राहतो. परंतु कॉल आणि इंटरनेट वापरता येत नाही. पण, विमान उडण्यापूर्वी (Flight Take Off) फोन फ्लाईट मोडमध्ये ठेवण्यास का सांगितले जाते याचा कधी विचार केला आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवल्याने गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर विमानात फ्लाइट मोड चालू नसेल तर मोबाईल फोनच्या सिग्नलचा विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टमवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे वैमानिकाला संवाद साधण्यात अडचण येऊ शकते. उड्डाणात असताना फोनचा वापर विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यत्यय आणू शकतो. म्हणूनच फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.


Knowledge News: डिलिव्हरी बॉक्स आणि पेपर बॅग खाकी रंगाचे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण


फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवल्यानंतर, तुम्ही फोटो क्लिक करण्यासाठी, आधीच सेव्ह केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी स्मार्टफोन वापरू शकता. मात्र, या काळात कॉल करता येणार नाहीत आणि इंटरनेटही वापरता येणार नाही.