Delivery Box Color Is Brown: आजकाल लोकं खरेदी करण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते. त्याचबरोबर बाजारात जाण्यायेण्याचा खर्चही वाचतो. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर अवघ्या काही दिवसात घरपोच मिळते. त्याचबरोबर वस्तू खराब असल्यास परत देखील करता येते. पण तुम्ही कधी डिलिव्हरी बॉक्स किंवा पेपर बॅगचं निरीक्षण केलं आहे का? पार्सल खाकी रंगाच्या बॉक्स किंवा पेपर बॅगमध्ये येतं. तुम्हाला माहीत आहे का, हे बॉक्स खाकी रंगाचे का असतात? चला तर जाणून घेऊयात
पार्सल ज्या कुरिअर बॉक्समध्ये येतात ते कॉर्पोटने बनवलेले असतात. कॉर्पोट पूर्णपणे कागदाचा बनलेला आहे. हा नैसर्गिक पेपर असतो आणि कागद ब्लीच केलेला नसतो. त्यामुळे खाकी रंगाचा असतो. नैसर्गिक पेपर ब्लीच केल्यानंतर पांढरे होतात. कारण त्यावर सहजपणे लिहिता येईल. पण पार्सल बॉक्ससाठी पेपर पांढरा करण्याची आवश्यकता नसते. तसेच पेपर ब्लीच करण्याचा खर्च देखील वाचतो.
Knowledge News: बिअरच्या बाटल्या तपकिरी किंवा हिरव्या का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण
Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्या देखील वस्तूंच्या ऑनलाइन पार्सलसाठी कॉर्पोट बॉक्स वापरतात. कारण कुरिअरसाठी वापरल्या जाणार्या कॉर्पोट बॉक्ससाठी कोणताही ग्राहक अतिरिक्त पैसे देत नाही.