Why Sleepers Called Hawai Chappal in India: आपल्या आसपास अनेक वस्तू असतात. त्या त्या वस्तूंची नावं त्यांच्या गुणधर्मानुसार ठरलेली असतात. काही नावं उच्चारली तर तरी तसा फील येतो. पण काही वस्तूंची नाव अशी का आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आपण लहानपणापासून 'हवाई चप्पल' नाव ऐकलं आहे. हवाई चप्पल जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. काळानुरूप हवाई चप्पलमध्ये बदल होत गेले. आजही लोकं मोठ्या प्रमाणात हवाई चप्पल वापरतात. भारतात याला 'हवाई चप्पल' (Hawai Chappal) म्हणतात. या चप्पलची डिझाईन खूप जुनी आहे. स्लिपर हवेत तर उडत नाही मग 'हवाई चप्पल' असे नाव का ठेवलं असेल? तुम्हाला यामागचं कारण माहिती नसेल तर जाणून घ्या


यामुळे म्हणतात हवाई चप्पल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवाई चप्पल घातल्यानंतर हवेत उडतो, असा काहीच संदर्भ नाही. चप्पल घातल्यानंतर चालायला खूप आरामदायी आणि हलके वाटते. म्हणूनच याला 'हवाई चप्पल' म्हणत असावे असं काही जणांचं म्हणणं आहे. इतिहासकारांच्या मते, अमेरिकेत "हवाई आयलँड" नावाचे एक बेट आहे. त्या बेटावर एक विशेष प्रकारचे झाड आढळते, ज्याला 'टी' असे म्हणतात. या झाडातून रबरासारखं फॅब्रिक तयार केले जाते, जे अतिशय लवचिक असते. या फॅब्रिकपासून चप्पल तयार केली जाते. त्यामुळेच या चप्पलला 'हवाई चप्पल' म्हणतात.


Video: डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो, ही ट्रिक वापरली तर फक्त 13 सेकंद लागतील


जापान आणि चप्पल


जापान आणि चप्पलचा संबंध जोडला जात आहे. जापानमध्ये चपलांचा वापर फार पूर्वीपासून होत होता. या चप्पलांना जोरी असं म्हंटलं जातं. एका कथेनुसार, जापानमधून मजूर अमेरिकेच्या हवाई बेटावर कामासाठी पाठवले होते. हे मजूर जापानी चप्पल घालून हवाईला गेले होते. चप्पलेची डिझाईन भावली आणि तशीच चप्पल बनवण्यात आली. म्हणून चप्पल आणि हवाई आयलँड असा संदर्भ जोडला जात आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी हवाई चप्पल वापरली होती. त्यानंतर जगभरात या नावानं प्रसिद्ध झाली.