Why Social Media Emoji Color Yellow Know About It: तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग एकमेकांजवळ आहे. तसेच सोशल मीडिया अ‍ॅपमुळे रोजच्या रोज संवाद होत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि मॅसेंजरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या जात आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर युजर्स लिहिण्यासाठी इमोटिकॉन म्हणजेच इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. कारण एका इमोजीमुळे आपल्या भावना व्यक्त होतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात इमोजी हे भावना व्यक्त करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम ठरत आहे. इमोजी हा शब्द E+Moji या दोन शब्दांनी बनला आहे. जापानी भाषेत ई म्हणजे चित्र आणि मोजी म्हणजे अक्षर. म्हणून इमोजीला चित्रमय संदेश म्हणूनही संबोधलं जातं. जगभरात 17 जुलै हा इमोजी दिवस म्हणून साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद, दु:ख, उत्साह आणि राग व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो. या इमोजींचा आपण सर्रास वापर करतो. पण अनेकदा प्रश्न पडतो की हे इमोजी पिवळ्या रंगाचे का असतात? इमोजी पिवळे असण्यामागे नेमकं कारण काय आहे. तसं पाहिलं तर इमोजीच्या रंगाबाबत आतापर्यंत विशेष रिसर्च झालेलं नाही. पण काही तज्ज्ञांनी इमोजीचा रंग पिवळा असण्यामागचं कारण सांगितलं आहे. आज तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत. 


काही तज्ज्ञांचे मते, इमोजी एखाद्या विशिष्ट रंगाच्या त्वचेच्या रंगाशी निगडीत बनवले तर ते देखील वर्णद्वेषी दिसू शकतात, म्हणून ते पिवळे केले गेले आहेत. तर काही तज्ज्ञांच्या मते, हसरा आणि फुलणारा चेहरा पिवळा दिसतो, म्हणून इमोजीचा रंग पिवळा ठेवण्यात आला आहे. बहुतेक लोकांच्या मते, पिवळा आनंदाचे प्रतीक आहे, म्हणून या रंगात भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या जातात.



सोशल मीडिया साईटवर अनेक इमोजी आपल्याला पाहायला मिळतात. पण जगभरात काही ठराविक इमोजीच मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अति आनंदामुळे डोळ्यात अश्रू आणि जोरात हसणारा इमोजी जगभरात जास्त वापरला जातो. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि चीनच्या पिकिंग विद्यापीठाने 212 देशांतील 427 दशलक्ष संदेशांच्या आधारे केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. त्याचवेळी हार्ट इमोजीला दुसरे आणि हार्ट आयज इमोजीला तिसरे स्थान मिळाले.



1999 मध्ये शिगेताका कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी तयार केले होते आणि फक्त जापानी युजर्स डोळ्यासमोर ठेवून केले होते. त्यानंतर इमोजीच्या इतिहासात अनेक बदल झाले.