Term Insurance Policy Cover: भविष्याच्या दृष्टीकोनातून काही पॉलिसी महत्त्वाच्या असतात. घरातील कर्ता पुरुषाला अचानक काही झालं तर कुटुंबावर आर्थिक संकट ओढावत नाही. त्यामुळे कुटुंबाच्या भविष्यासाठी काही तरतुदी करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये टर्म इंश्युरन्स पॉलिसी (Term Insurance Policy) आघाडीवर आहे. या पॉलिसीमुळे कुटुंबावर ओढावलेलं आर्थिक संकट दूर केलं जाऊ शकतं. कोरोना काळात या पॉलिसीचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं आहे. पॉलिसी घेताना महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तीन महिन्यांची सॅलरी स्लिप, सहा महिन्यांचा बँक स्टेटमेंट, वार्षिक उत्पन्न, बँकेचा कँसल चेक, फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड, कुटुंबाची संपूर्ण माहिती द्यावी लागते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तीन वर्षाचं फाईल रिटर्न आवश्यक आहे. या दस्ताऐवजानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती वैद्यकीय तपासणी. हे एक डॉक्युमेंटेड प्रुफ आहे. या माध्यमातून आरोग्याबाबत डिक्लेरेशन केलं जातं. जर तुम्ही हेल्थ कंडिशनबाबत माहिती दिली नाही तर भविष्यात क्लेम रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय तपासणी खूप महत्त्वाची आहे. 


काय काय वैद्यकीय तपासणी होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य चाचण्या वेगळ्या असतात. यामध्ये तुमचा आणि तुमच्या कुटुंबाची मेडिकल हिस्ट्री लक्षात घेऊन तपासणी केली जाते. सामान्यतः उंची आणि वजन, रक्त तपासणी आणि लघवीची तपासणी करणे सामान्य आहे. लघवी चाचणीसह, नमुन्यात आढळलेले कोटिनाइन आवश्यक पातळीत असल्याचे तपासले जाते. तुमच्या शरीराची मूलभूत मोजमापे तुम्हाला तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) समजण्यास मदत करतात. 


बातमी वाचा- Passport Application: पासपोर्ट बनवायचा आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


कोणत्या वैद्यकीय चाचण्या महत्त्वाच्या आहेत


विमा कंपन्या रेग्युलर युरिन टेस्ट आणि युरिन कोटिनाइन टेस्ट यांची तपासणी करतात. यासोबतच रक्त चाचण्या, संपूर्ण रक्त मोजणी (CBC), लिपिड प्रोफाइल, लिव्हर फंक्शनल टेस्ट, किडनी फंक्शनल टेस्ट, फास्टिंग ब्लड शुगर, ECG/TMT/2D इकोकार्डियोग्राफी, अल्ट्रासोनोग्राफी (पोट), छातीचा एक्स-रे, एचआयव्ही टेस्ट केली जाते. या चाचण्यांव्यतिरिक्त, डॉक्टर उंची, वजन, रक्तदाब आणि वैद्यकीय इतिहास यासारख्या शरीराची इतर महत्त्वाची माहिती देखील नोंदवतात. बऱ्याच परिस्थितींमध्ये, तुम्हाला अतिरिक्त चाचण्यांसाठी देखील विनंती केली जाऊ शकते.


बातमी वाचा- Gold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित


वैद्यकीय चाचणीचे फायदे 


  • पॉलिसी खरेदी करताना वैयक्तिक माहिती देताना झालेल्या चुकांमुळे दावा रद्द केला जातो. पॉलिसी खरेदी करताना वैद्यकीय चाचणी करून घेतल्याने तुम्हाला यातून सूट मिळते. कारण हे रिपोर्ट्सच तुमच्या फिटनेसचा पुरावा आहेत. 

  • वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नसलेल्या विमा पॉलिसींमध्ये अनेकदा मोठा प्रीमियम असतो. हे जोखीम कव्हर करण्यासाठी आहे. त्यामुळे विमा पॉलिसी महाग होते.

  • वैद्यकीय चाचण्या नसलेल्या योजना वैद्यकीय चाचण्यांची विनंती करणाऱ्या योजनांच्या तुलनेत कमी कव्हरेज देतात. चाचणी अहवालासह, कंपनी तुमच्या जोखीम प्रोफाइलचा अचूक अंदाज लावू शकते. त्यामुळे तुम्हाला अधिक कव्हरेज मिळेल.