Toilet Interesting Facts in Marathi: मॉलमध्ये फिरायला कोणाला नाही आवडत. पगार झाला की अनेकांची पहिली पसंती असते ती शॉपिंग. अनेकजण शॉपिंग करण्यासाठी मॉलचा पर्याय निवडतात. घरात वापरात येणाऱ्या साबणापासून ते लाखोंच्या मोबाईलपर्यंत मॉलमध्ये (Malls) मिळतात. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता आणि तिथलं टॉयलेट वापरता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? टॉयलेटचे दरवाजे (Toilet doors) जमिनीपासून सामान्य टॉयलेटपेक्षा उंचीवर असतात. असं का असतं? अनेक मोठ्या ऑफिसमध्ये देखील टॉयलेटच्या दरवाजांची उंची ही सामान्य टॉयलेटच्या उंचीपेक्षा अधिक असते. यामागे नेमकं लॉजिक काय आहे? 


काय आहे कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्णपणे बंद असलेल्या शौचालयामुळे गुदमरल्यासारखं जाणवतं. त्यामुळे अनेकांना नर्व्हसनेस जाणवतो. उंच दरवाजांमुळे स्वच्छतागृहात दुर्गंधी राहत नाही आणि हवेचं वेंटिलेशनही चांगलं राहतं. त्यामुळे अशा ठिकाणी नकारात्मक परिणाम होत नाही.


साफसफाई


मॉल्स आणि ऑफिसमध्ये बनवलेले दरवाजे जमिनीपासून उंचीवर असतात. त्याचं कारण म्हणजे साफसफाई. दरवाजे उंचीवर असल्याने साफसफाई करणं सोपं जातं. मॉल्स किंवा ऑफिस अशा ठिकाणी वारंवार करावी लागते, अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांना जमीन पुसण्यात कमी त्रास होतो. उंच दरवाजांमुळे फरशीचा ओलावा किंवा दरवाजा खराब होत नाही.


आपत्कालीन परिस्थिती


मॉल्स किंवा ऑफिसमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असते. तसेच अनेकदा शौचालयात आपत्कालीन परिस्थिती घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिगर्दीच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली असते. यातून एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर देखील काढलं जाऊ शकतं.


लहान मुलं


टॉयलेटचे दरवाजे उंच असण्यामागे लहान मुलेही एक कारण आहेत. शौचालयाचा दरवाजा बंद केल्याने मुले आत अडकून पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उंच दरवाजे असल्यामुळे ते सहज काढता येऊ शकतं.


आणखी वाचा - ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील


दरम्यान, इंटेरियर डिझायनिंगच्या अभ्यासानुसार, असे टॉयलेट अधिक पाहण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी असतात. मात्र, घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये अशा प्रकारचे टॉयलेट्सचे डिझाईन्स फार क्वचित पहायला मिळतील. येत्या काळात अशा प्रकारचे डिझाईन्स अनेक ठिकाणी दिसू शकतात, हे मात्र नक्की.