मुंबई : आजच्या काळात लोकांच्या घरात नळाने पाणी पुरवले जाते. त्याला घराघरात पोहोचवण्यासाठी पाइपलाईन बसविण्यात आल्या आहेत. पंपाचा वापर करुन पाणी अगदी उंच ठिकाणी सुद्धा सहज पोहोचता येते. आता पंप आणि पाईपलाईन यामुळे विहीरींचा वापर कोणी करत नाही. बऱ्याच वेळेला शहरातील विहीरींचा वापर होत नसल्यामुळे विहीरी भरुन वाहत आहेत. तर बर्‍याच ठिकाणी ग्रामीण भागात विहीरी अगदी कोरड्या पडल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वीपर्यंत एक किंवा दोन विहीरीमधून संपूर्ण गावाला किंवा शहरांना पाणी पुरवले जात होते. शक्यतो विहीरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, विहीरीचा आकार गोल का असतो? त्यांची बांधनी गोलच का केली जाते?


विहिरींना गोल आकार देण्याचे कारण


विहिरीचा आकार गोल बनविण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. याचे मुख्य कारण असे आहे की, जेव्हा जेव्हा विहिरीच्या आत पाणी वाढते तेव्हा ते एकाच वर्तुळात फिरते आणि ते गोल फिरुन ते वर वर येऊ लागते आणि विहीर भरते. परंतू जर विहिर चौरस असेल तर पाणी विहिरीच्या खालच्या भिंतीस कमकुवत करू शकते. विहीर गोल असल्याचा असा फायदा होतो की, पाणी विहीरीच्या भिंतीवर आदळणार नाही, आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे भिंतीची मोडतोड होण्याचा धोका ही खूप कमी होतो.



पाणी जमा करताना मजबूती


विहिर खोदण्याच्या वेळी ती सहज गोल आकारात ड्रिल करता येते. तसेच विहिरीमध्ये पाणी साठा करताना गोल आकारमुळे मजबूती येते, जर ही विहिर चौकोनी आकारात बनवली गेली तर, पाण्याचे दाब चारही कोपऱ्यावर पडतो आणि भिंत कमकुवत होण्याचा धोका वाढतो. एवढेच नाही तर  विहीरीची भिंत गोल असल्यामुळे त्याची भिंत पडत नाही. जर विहीर चौकोनी बनविली असेल त्याला चार भिंती असतील आणि त्यातील एखादा भाग पडल्यास संपूर्ण विहीरीली धोका उद्भऊ शकतो. गोल विहीर अधिक दबाव सहन करण्यास सक्षम आहे.