नवी दिल्ली : मेकअप आणि महिला यांचं विशेष प्रेम असतं. नवऱ्याला किंवा पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी आणि स्वत:साठी देखील अनेक महिला मेकअप करतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काही जणांना मेकअपचं वेड असतं. एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये महिलेला मेकअप न आवडल्याने त्याचा राग अनावर झाला आणि भयंकर प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेला केलेला मेकअप आवडला नाही म्हणून चक्क पती बुलडोजर घेऊन पार्लरसमोर पती आला. त्याने दुकानाचं मोठं नुकसान देखील केलं. महिलेला केलेला मेकअप आणि नेसलेली साडी दोन्ही आवडली नाही. तिने सलूनमधील सर्वांना फैलावर घेतलं. अखेर रागाच्या भरात पतीला फोन लावून सर्व घडलेला प्रकार सांगितला. 


पत्नीचा राग पाहून जेई राकेश पती तिथे पोहोचला आणि त्याने मॅनेजरशी हुज्जत घातली. त्यावेळी मॅनेजरने समवजण्याचा खूप प्रयत्न केला मात्र दोघंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. पतीने अखेर रागात बुलडोजर आणून तिथे तोडफोड केली आणि सलूनचा चेहराच बदलला. 


ही धक्कादायक घटना हरियाणातील गुरुग्राम भागात घडली आहे. खरंतर जेई राकेशकडे सलूनची तोडफोड करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. मात्र तरीही त्याने असा प्रकार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.