समुद्रात बुडालेल्या पत्नीचा व्हॉइस मेसेज, पतीसह कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली
पतीला वाटलं ती वाहून गेली, मात्र प्रत्यक्षात काही वेगळचं होत, `त्या` व्हॉइस मेसेजने प्रकरणात आणला मोठा ट्विस्ट, काय आहे संपुर्ण प्रकरण वाचा
विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमधील एका समुद्रकिनाऱ्यावरून पत्नी वाहून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पतीने पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानुसार तपास करायला सुरुवात केली होती. मात्र दोन दिवस उलटूनही पत्नीचा तपास लागत नव्हता.या दरम्यान पत्नीने अचानक पाठवलेल्या व्हॉइस मेसेजने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणला. हा व्हॉइस मेसेज एकूण पतीच्या पायाखालचीच जमीन सरकली.
पती श्रीनिवास पत्नी सई प्रियासोबत सोमवारी संध्याकाळी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आरके बीचवर फिरायला गेले होते. समुद्रकिनारी एन्जॉय करत असताना पत्नी अचानक गायब झाली होती. श्रीनिवासला वाटलं की ती समुद्राच्या लाटांसोबत पाण्यात वाहून गेली अथवा बुडाली असावी असा त्याचा अंदाज होता. त्यानुसार त्याने पत्नी पाण्यात बुडल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी साई प्रिया समुद्रात पाय धुण्यासाठी गेली होती. पण, परत आलीच नाही. दोन दिवस तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खूप प्रयत्न करूनही तिचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी
या शोध मोहिमेत सुमारे एक कोटी रुपये खर्च केल्याची सूत्रांची माहिती आहे. तरीही तिचा थांगपत्ता लागला नव्हता.
मेसेजमध्ये काय होतं?
पोलिसांची शोध मोहिम सुरु असतानाचं बेपत्ता पत्नीचा व्हॉइस मेसेज आला होता. या मेसेजमध्ये तिने म्हटले, "मी साई प्रिया बोलतेय, मी जिवंत आहे आणि रवीसोबत (प्रियकर) आनंदात आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप दिवसांपासून प्रेम करतो, आम्ही लग्नही केलंय, आमची काळजी करू नका, शोधण्याचा प्रयत्नही करू नका, मी पळून-पळून थकले आहे, तुम्ही जास्त दबाव टाकलात तर मी स्वत:चं बरंवाईट करेन. मला पोलीस आणि प्रशासनाची माफी मागायची आहे. रवीच्या कुटुंबाला त्रास देऊ नका, यात त्यांचा काहीही दोष नाही", अशी माहिती पोलिसांनी दिली. हा व्हाईस मेसेज एकूण पती आणि कुटुबियांना मोठा धक्का बसला.
दरम्यान श्रीनिवास आणि प्रिया यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. दोघेही एकमेकांसोबत खुश नव्हते, कारण साई प्रियाचं रवीवर प्रेम होतं.तिच्या मोबाईल कॉल डेटावरून ती तिच्या प्रियकरासोबत बंगळुरूमध्ये असल्याची शक्यता आहे.या प्रकरणात पोलीस पत्नीचा शोध घेतायत.