Crime News : लग्नानंतर अनेकवेळा काही पती-पत्नी विभक्त झालेले आपण पाहिले आहेत, हुंड्याची मागणी करत तिला नांदवू न देणं. लग्नानंतरही पतीचं बाहेर दुसऱ्या महिलेसोबत अफेर किंवा कौटुंबिक वादातून अनेक संसार मोडतात, अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. जून महिन्यात लग्न झालेल्या पत्नीने तिच्याच पतीविरोधात तक्रार दाखल गंभीर आरोप केला आहे. (wife filed a complaint against the husband physical relation latest marathi crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण
तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचं गेल्या जून महिन्यात लग्न झालं होतं. काही दिवसातच तिला नवऱ्याचं खरं रूप दिसून आलं. तिचा पती हुंड्याची मागणी करत मारहाण करायचा. अखेर वैतागलेल्या महिलेने हिंमत करत पोलीस स्टेशनमध्ये जात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये, हुंड्याचे पैसे दिले नाही पती माझ्यासोबत अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. 


ज्याच्यासोबत सात जन्म साथ देण्याची शपथ घेतली तोच असं वागेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. महिलेने केलेली तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेत संबधित पतीविरोधात कलम 498, 506, 511 आणि 377 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे.