Viral Video : नवरा बायकोचं नातं विश्वास, प्रेम आणि आदर असतं. पण या नात्यात आंबट गोड अनुभव देखील असतात. खरं तर भांडण्याशिवाय नवरा बायकोमधील नातं अपूर्ण असं म्हणायला हरकत नाही. या गोड भांडण्यातून प्रेम वाढतं असं म्हणतात. पण या भांडण्याचं रुपांतर संघर्षात झालं तर ते नातं तुटतं. पण छोट्या छोट्या कारणावरुन होणाऱ्या वादावादीला कधीही गंभीर स्वरुप प्राप्त होऊ देऊ नका. (Wife hit husband in flight husband appealed air hostess to help Video Viral Internet today Trending News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर चक्क विमानात नवरा बायकोच्या वादाची एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. कारणही तसंच आहे. विमानात कुठल्या तरी कारणावरुन नवरा बायकोचा वाद होतो. या वादात बायको नवऱ्याच्या कानशिलात लगावते. त्या क्षणी नवरा बायकोच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी एअरहोस्टेसला मदतीसाठी हाक मारतो. 


''माझ्या पत्नीपासून मला त्रास होतोय मला. कृपया मला वाचवा'' नवरा बायकोमधील वादाने विमानातील इतर प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं. फ्लाइटमध्ये बसलेल्या एकाने या घटनेचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर यूजर्सही संतापले आहेत.  


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पतीने एअरहोस्टेसला हाक मारल्यानंतर पत्नीने आपला चेहरा झाकून घेतला. या व्हिडीओमध्ये पुढे बघू शकता, ती महिला आणि प्रवाशी हसताना दिसत आहेत. 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील tehelkaprankandtehelkavlogs या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी या जोडप्याने हा रील बनवल्याचं बोलं जातं आहे. फ्लाइटमध्ये असे कृत्य केल्याबद्दल नेटकरी वैतागल्या आहेत.



 एका युजरने म्हटलं की, 'महिला तिच्या पतीला मारत आहे. हे अजिबात हास्यास्पद नाही. तर दुसऱ्याने युजरने म्हटलं की, 'एवढ्या लोकांच्या मध्ये आपला चेहरा लपवणे किती कठीण आहे.'