जंगलात वाघांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचा गैरवापर, महिलांचे नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल
संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आलीय. अहवालात एका स्थानिक महिलेने सांगितलं की, `आम्ही जंगलात गुडघ्यापर्यंत कपडे घालू शकतं नाही. तर शौचालयाला जाऊ शकतं नाही. कारण आम्हाला जंगलात फिरताना प्राण्यांची नाही तर...`
उत्तर भारतातील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाशेजारी राहणाऱ्या महिला गेल्या काही महिन्यांपासून भीतीचा छायेखाली वावरत आहेत. कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाशेजारी गावातील महिला उदरनिर्वाहसाठी जंगलातील लाकूड अनेक वनस्पतीचा वापर करतात. त्यासोबत महिला आपला दीनचार्यसाठी म्हणजे जंगलात शौचसाठी जातात. जंगलात वावरताना महिला बिनधास्त वावरु शकतं नाही. कारण त्यांच्यावर सतत कोणीतरी नजर ठेवून असतं. (wildlife monitoring tech used to harass spy on women in forest video of women goes viral on social media)
जंगलातील वाघ आणि हत्ती सारख्या वन्यप्राण्यांचा हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्स, ड्रोन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण या तंत्रज्ञानाचा वापर भारतातील महिलांना घाबरवण्यासाठी, छळण्यासाठी आणि हेरगिरी करण्यात होत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार 22 नोव्हेंबरला संशोधक त्रिशांत सिमलाई यांनी सांगितलं की, एका अत्यंत गंभीर प्रकरणात लोकांनी सोशल मीडियावर जंगलात नको त्या अवस्थेत असतानाचा महिलेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर तो व्हायरलही झाला. हे प्रकरण ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी गावाजवळील कॅमेरा ट्रॅप तोडले.
केंब्रिज युनिव्हर्सिटी, यूकेचे संशोधक त्रिशांत सिमलाई यांनी उत्तर भारतातील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाभोवती 14 महिने राहणाऱ्या सुमारे 270 लोकांची मुलाखत घेतली. सिमलाई यांनी एएफपीला सांगितले की राखीव क्षेत्राच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी जंगल हे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचं ठिकाण आहे, 'पुराणमतवादी आणि पितृसत्ताक समाजापासून दूर' असं ते ठिकाण आहे. जंगलातून लाकूड आणि गवत गोळा करताना महिला गातात, त्यावेळी त्या एकमेकांशी शारीरिक संबंधासारख्या विषयांवर बोलतात. कधी कधी त्या दारू आणि सिगारेटही पितात.
पण सिमलाई म्हणाली की कॅमेरा ट्रॅप्स, ड्रोन आणि ध्वनी रेकॉर्डरच्या स्थापनेद्वारे वाघ आणि इतर वन्यजीवांचा मागोवा घेण्याऐवजी जंगलात येणाऱ्या या महिलांच्या खाजगी आयुष्यात शिरतात आहेत. सिमलाई यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण आणि नियोजन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असंही सांगण्यात आलंय की, अनेक वेळा ड्रोन महिलांच्या डोक्यावरून जाणूनबुजून उडवले गेले आणि त्यांना त्यांच्या काठ्या टाकून आच्छादनासाठी धावण्यास भाग पाडल्या गेल्याचही उल्लेख त्यात आहे.
धक्कादायक म्हणजे एका वन रेंजरने संशोधकांना सांगितलं की, जेव्हा कॅमेरा ट्रॅपमध्ये एका जोडप्याचा जंगलात रोमान्स करतानाचा फोटो कैद झाला, तेव्हा आम्ही ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. 2017 मध्ये, कॅमेरा ट्रॅपने चुकून एका दुर्लक्षित समाजातील एका ऑटिस्टिक महिलेचा फोटो कॅप्चर केला होता. एवंढच नाही तर वन कर्मचारी म्हणून कामावर असलेल्या तरुणांनी महिलेला लाजवेल असे फोटो स्थानिक व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुपवर शेअर केल्याचे सिमलाई यांनी या अभ्यासात सांगितलंय.
अभ्यासात असंही सांगण्यात आलं की, कॅमेरे टाळण्यासाठी काही महिलांनी जंगलाच्या अंतर्गत भागात जाण्यास सुरुवात केली आहे, जिथे वाघांची संख्या सर्वाधिक आहे. 2019 मध्ये कॅमेऱ्यांच्या भीतीने एक महिला अज्ञात ठिकाणी गेली आणि ती या वर्षाच्या सुरुवातीला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.