मुंबई: पद्मावत चित्रपटाच्या वादाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. पद्मावत प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा पुनरूच्चार करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजरातपाठोपाठ आता राजस्थान आणि हरियाणामध्येही हिंसात्मक आंदोलनं केली. हरियाणातल्या गुरूग्रामध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यावर बसेसची जाळपोळ करण्यात आली. तर राजस्थानच्या अनेक शहरांमध्येही करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनं केली.



चित्तोडगडमधल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.